Home विदर्भ बीरसा ब्रिगेड शाखा शिवरा अध्यक्ष पदी दिलीप कुमरे

बीरसा ब्रिगेड शाखा शिवरा अध्यक्ष पदी दिलीप कुमरे

118

यवतमाळ  /  राळेगाव – आज दिनांक २ जानेवारी रोजी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत राळेगाव उपविभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोल्हे, राळेगाव तालुका अध्यक्ष दिनेश करपते,सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके, राळेगाव तालुका कार्याध्यक्ष समीर केराम ,जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी यांनी बीरसा ब्रिगेड शाखा शिवरा, तालुका राळेगाव कार्यकारिणी गठित केली.

यावेळी शाखा अध्यक्ष दिलीप कुमरे ,उपाध्यक्ष महादेव मेश्राम, सचिव अंकुश आडे ,कार्याध्यक्ष विनोद कोवे, सहसचिव नंदकिशोर आडे , संघटक सचिन गेडाम यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन व बैठक घेऊन करण्यात आली.

यावेळी भगवान कोवे,नंदू सलाम, आकाश कोवे, रोहित आडे ,सुभाष पेंदोर , दयाल आत्राम, चंद्रशेखर कोवे, नीलेश मरस्कोले, बंडू सलाम , स्वप्निल गेडाम, सुरज मरस्कोले, पवन कुमार आदी तालुका राळेगाव येथील शिवरा शाखेचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.