Home मराठवाडा कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता’ तर सागर कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ठ...

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता’ तर सागर कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्काराची घोषणा – ना.राजेश टोपे

423

जालना -लक्ष्मण बिलोरे

वसंतदादा शुगर इन्सि्टटयुट,पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूरस्कार जाहीर करण्यात आले त्यामध्ये कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं.१ अंकुशनगर करीता उत्तर पुर्व विभागातून पाचव्यांदा ‘सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता’ आणि युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरी करीता पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,वसंतदादा शुगर इन्सि्टटयुट,पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.गळीत हंगाम २०२०-२१ करीता उत्तर पुर्व विभागातून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं.१ अंकुशनगर करीता साखर उतारा,बंद वेळेचे प्रमाण,गाळप क्षमता वापर,गाळप क्षमता वापरामध्ये झालेली वाढ,रिडयुस्ड ओव्हरआॅल रिकव्हरी,रिडयुस्ड मील एक्स्ट्रॅक्शन या जमेच्या बाबी विचारात घेऊन पाचव्यांदा ‘सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता’ आणि युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरी करीता आर्थिक वर्ष २०१९-२० करीता साखरेचा प्रति क्विंटल उत्पादन व प्रक्रीया खर्च राज्याच्या सरासरी रोखीच्या उत्पादन प्रक्रीया खर्चापेक्षा कमी आहे.खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी एकुण उत्पादन प्रक्रीया खर्चापेक्षा कमी असल्याने पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार करीता निवड झाली आहे.सदरहू पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे वसंतदादा शुगर इन्सि्टटयुट,पुणे यांनी कळविले आहे.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगरकडे ३ जानेवारी २०२२ अखेर ५६ दिवसामध्ये २ लाख ५५ हजार ८८० मे.टन ऊस गळीत होऊन २ लाख २२ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.सरासरी साखर उतारा ८.९१% मिळाला आहे.डिस्टीलरी प्रकल्पाकडे ११ लाख ६६ हजार १६८ बल्क लिटर्स अल्कोहोल व ९ लाख ५९ हजार २१२ बल्क लिटर्स इथेनाॅलचे उत्पादन झाले आहे.

कारखान्याचा सहवीज निर्मीती प्रकल्पाकडे २ कोटी ११ लाख ५५ हजार युनिट वीज निर्मीती झाली असून ७४ लाख १२ हजार युनिट वीज कारखान्याने स्वतःसाठी वापरली असून १ कोटी ३७ लाख ४३ हजार युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केली आहे.तसेच कारखान्याचे युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडे ५४ दिवसामध्ये १ लाख ५६ हजार ४१० मे.टन ऊस गळीत होऊन १ लाख ५३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा ९.९८% मिळाला आहे.
अशी माहिती समर्थ उद्योग समुहाचे मार्गदर्शक आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी दिली.कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराब­द्दल कारखान्याचे सभासद शेतक-यांमधून अभिनंदन होत आहे.