मनिष गुडधे……
अमरावती – देशभरात 3 जानेवारी म्हणजेच सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीनांच्या कोरोना विरोधी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अंबापेठ येथील मणिबाई गुजराती विद्यालयात आज 361 विद्यार्थ्यांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली. लस घेण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविराधातील लढाई अधिक मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंता ही दूर होणार आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून मणिबाई गुजराती विद्यालयात आज 361 विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पडले.
लसीकरणासाठी चोख नियोजनमणिबाई गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली देव यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रथम गुगल वरुन आभासी पद्धतीने लस घेण्यास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांशी त्यांनी स्वत: व संबधीत पर्यवेक्षकांनी संवाद साधला. मुलांसाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पालकांकडून पाल्याच्या लसीकरणासाठीचे संमतीपत्र मागवून घेण्यात आले. त्यानुसार पात्र 750 विद्यार्थ्यांपैकी 410 विद्यार्थ्यांचे संमती पत्र प्राप्त झाले व लसीकरणाबाबत पालकांनी सकारात्मकता दर्शविली. ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक अडचणी आहेत त्यांना कोरोना लसीची पहिली मात्रा थोड्या अंतराने देण्यात येणार असल्याचे श्रीमती देव यांनी सांगितले. शाळेला लसीचे 500 डोज उपलब्ध झाले असून आज 361 विद्यार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली अशी माहिती त्यांनी दिली. शाळेतील दोन सभागृहांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विश्रांती कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यादरम्यान बिस्कीटे व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.पाच शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात
जिल्ह्यातील अंबापेठ येथील मणिबाई गुजराती हायस्कुलसह ब्रिजलाल बियाणी विद्यालय व रामकृष्ण क्रिडा विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु आहे. तसेच रविनगर येथील भवरीलाल सामरा व नारायणदास लढ्ढा येथे लसीकरणासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.लस घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रीया यावेळी व्यक्त केली.1. श्रीनिवास कुळकणी – कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यायला हवी. कोरोनापासून बचाव करायचा तर लस हेच कवच आहे. लसीची कोणतीही भिती न बाळगता लस सर्वांनी घ्यावी. लसीकरणामुळे प्रतिकारशक्तिचा विकास होऊन आपण कोरोनाला बळी पडण्यापासुन स्वत: ला वाचवू शकतो2. मुक्ताई व्यवहारे- विद्यार्थ्यांची सुरक्षितता खुप महत्वाची आहे. लस घेतल्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. रोजचे व्यवहार, शाळा, अभ्यास, वर्ग, परीक्षा ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आपले आरोग्य आहे. कोरोनापासून बचाव करायचा तर आपण सर्वांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सॅनीटायझर व भौतिक अंतरांचे पालन आम्ही करणारच आहोत.3. साहील खोडे- कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यामुळे शालेय शिक्षण व परीक्षा देखील सुरक्षित पार पडतील असा विश्वास वाटतो. लस घेतल्यामुळे शालेय वर्ष सुरळीत पार पडेल असा दिलासा मिळाला आहे. आरोग्य व शिक्षण ह्या दोन्ही बाबी लसीकरणामुळे शक्य होणार आहे.4. तन्वी नानोटे- कोरोनापासून बचाव करण्यात लसीकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. लसीकरण करुन घेण्याला आपण आपले कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हायला हवे. लसीकरणासाठी मी माझ्या समवयीन मित्र मैत्रिणींना प्रोत्साहीत करणार आहे. सर्वांचे लसीकरण झालयास कोरोनाला नक्कीच आळा बसेल.5. विनोद मुंदे पालक – लसीकरण हे कोरोना विरोधी कवच आहे. लसीकरणामुळे आमचे पाल्य कोरोनापासुन सुरक्षित होत आहे. शाळामध्ये लसीकरणासाठी आवश्यक ते नियोजन व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दहावीत शिकणाऱ्या माझ्या मुलींला लसीकरणामुळे मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त केले.जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या समन्वयातून मणिबाई गुजराती शाळेत विद्यार्थ्यांच्या लसीच्या पहिल्या मात्रेचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्याचे मुख्याध्यापीका श्रीमती अंजली देव यांनी सांगितले. गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप पोपट व सचिव परेशभाई राजा तसेच उपमुख्याध्यापक अनिता पंजाबी, पर्यवक्षक उमा झा, प्रवणि सावजी, सरिता गायकवाड, दिनेश मेहता, दया चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचा लसीकरणात सहकार्य केले.