Home विदर्भ माळी समाज बहुउद्देशीय संस्था घाटंजी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती...

माळी समाज बहुउद्देशीय संस्था घाटंजी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती संपन्न

486

रांगोळी ठरले आकर्षण

यवतमाळ / घाटंजी – क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती माळी समाज बहुउद्देशिय संस्था र न f 19673 च्या वतीने संत जलाराम मंदिर घाटंजी येथे दि 3 जानेवारी 2022 ला सम्पन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ कल्पना ताई काकडे सरपंच खापरी या होत्या.

प्रमुख उपस्थिती श्री चांद्रकांतजी वानखडे (प्रा .गिलानी कॉलेज घाटंजी), श्री मोरेशवरराव पेटकुले( अध्यक्ष मा स ब संस्था घाटंजी), श्री रामभाऊजी किरणापुरे (माजी न प सदस्य), श्री नानाभाऊ उपरीकर (माजी न प सदस्य),श्री सुकुमार पेटकुले प्रदेशाध्यक्ष अखिल भा माळी महासंघ आदीलाबाद) श्री मधुभाऊ कावलकर (कवी व साहित्यिक आदीलाबाद), श्री उमेशराव ढोले(युवाअध्यक्ष माळी महासंघ आदीलाबाद,) श्री विजयराव वाटगुरे ( जिल्हा अध्यक्ष माळी महासंघ आदीलाबाद), मधुभाऊ बावलकर ( आदीलाबाद) हे होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे पूजन केले .माळी समाजातील सण 2020- 2021 वर्ग 10 वा, व 12 वा 80 % गुणावरील उत्तीर्ण विधार्थयांचे पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील उल्लेखनीय कार्य करणारे श्री किरण अशोकराव वाढई ( माजी सैनिक ) यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जि प शाळा वाढोना शाळेला जमीन दान दिल्याबद्दल श्री परशराम तुकाराम वाढई व सौ सावित्री परशराम वाढई यांचा शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला. सौ कल्पना शंकरराव काकडे ( सरपंच खापरी ) पदी निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री सुकुमार पेटकुले ( प्रदेश्याध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ आदीलाबाद) यांचे सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक जीवनचरित्र या विषयावर सुंदर व्याख्यान झाले. माळी समाजातील सावरगाव येथील सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ सविता दशरथ मोहूर्ले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भांब राजा येथील ग्रा प सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सौ ज्योती ज्ञानेश्वर लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांची उत्कृष्ट वेशभूषा केल्या वद्दल कु. कृष्णली विजयराव राऊत व प्रियान्शु सुनील उपरीकर याना पुष्पगुच्छ व प्रोत्साहन पर बक्षिस कौतुक करण्यात आले. उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल कु स्वरा सुनील किरणापुरे हिचा पुष्पगुच्छ व प्रोत्साहन पर बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षण सौ अस्मिता देवा दानव (चंद्रपूर)हिने काढलेल्या सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांचे रांगोळी ने काढलेल्या सुंदर चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री चंद्रकांतजी वानखडे, कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री मोहन शेंडे यांनी व आभार प्रदर्शन श्री अनिल वाढोनकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीत्यासाठी श्री मोरेशवरराव पेटकुले , श्री धनंजय बंगळे श्री राजू उपरीकर, श्री ज्ञानेश्वर लांजेवार , श्री विष्णू सोनूले ,श्री परमानंद पेटकुले, श्री भास्कर मोहूर्ले,श्री दिलीप महाजन ,श्री शंकर लेनगुरें, श्री दिनेश मोहूर्ले, अनिल वाढोनकर, श्री वसंत मोहूर्ले , श्री दिनेश गाऊत्रे ,घनश्याम कावडे, बालु पेटकुले श्री मंदार भुसारी ,विजयराव राऊत , सौ जयश्री किरणापुरे, सौ दुर्गा किरणापुरे, सौ स्वाती उपरीकर , सौ मनीषा सोनूले, सौ अर्चना वाढोनकर, सौ ज्योती लांजेवार,सौ मंजू उपरीकर,सौ सुवर्णा लेनगुरें, व माळी समाज बांधव घाटंजी यांनी परिश्रम घेतले.