कृषी विभागातर्फे रावेर तालुक्यात ऑनलाईन परवाना प्रणालीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
रावेर( शेख शरीफ)
बदलत्या काळात सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती होत असून आता कृषी विभागातर्फे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मिळणारे परवाने आता ऑनलाईन होणार असून सर्व परवाने ०१फेब्रुवारी २०२२ पासून पेपरलेस होणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.यासाठी रावेर येथील कृषी निविष्ठा चालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे अजंदा-धामोडी रस्त्यावरील ऑटोमेशन असलेल्या भास्कर वामनराव पाटील यांच्या शेतात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माफदा चे राज्याध्यक्ष विनोद तराळ होते.तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक अनिल भोकरे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे,तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे,पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील,कृषी विस्तार अधिकारी अनिल पवार,जळगाव कृषी विभागाचे संतोष भावसार,तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,उपाध्यक्ष सुनील पाटील,एकनाथ महाजन,सेक्रेटरी युवराज महाजन,डॉ जि एम बोंडे,चंद्रकांत अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमास प्रफुल्ल पाटील,विकास महाजन,श्रीपाद जंगले,भगवान महाजन,प्रदीप महाजन,भागवत पाटील,प्रकाश चौधरी,प्रमोद चौधरी,सुनील कुलकर्णी,भास्कर पाटील,अमोल लोखंडे,मनोज भंगाळे,श्रीकांत महाजन,वामनराव पाटील,गोपाळ पाटील,मंजित चौधरी,राहुल चौधरी,वैभव पाटील,रणजित चौधरी,अजय पाटील,राजू प्रजापती,राजीव भोगे,योगेश पाटील,स्वप्नील पाटील,राहुल शिंदे, प्रमोद शिवरामे,राहुल तायडे यांसह कृषी विक्रेते उपस्थित होते.
यावेळी ऑनलाईन परवान्याविषयी सविस्तर माहुती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिली.महिनाभराच्या आत या परवाना प्रक्रियेत नूतनीकरण गरजेचे असून यासाठी निविष्ठा चालकांना कृषी विभागाकडे चकरा मारायची गरज राहणार नाही असे ही श्री तायडे यांनी सांगितले.कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी या प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढणार असून निविष्ठा चालकांची व राज्यात कृषी उत्पादन विक्री करणाऱ्या कंपन्या यांची नोंदणी,विक्री सर्व पारदर्शक होईल तसेच काळाप्रमाणे बदल गरजेचा असून आपण तो स्वीकारला पाहिजे असे ही कृषी उपसंचालक श्री.भोकरे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी विविध दाखल्यांचे अनुभव सांगितले.ऑनलाईन प्रणालीत काही त्रुटी आढळल्यास आम्हास संपर्क करावा असे आवाहन ही त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.या ऑनलाईन प्रणालीमुळे भविष्यात खोट्या व चुकीच्या नोंदणी नसलेल्या कंपन्याना आला बसणार आहे.
माफदा अध्यक्ष विनोद तराळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिर व नोंदणीस सहकार्य करण्याचे आवाहन करून या प्रणालीच्या काही त्रुटींबाबत कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले.तसेच कृषी विभागातर्फे कृषी निविष्ठा चालकांना होत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निंबोल येथील राहुल पाटील यांनी तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले.