Home विदर्भ कंटेनर – दुचाकीच्या अपघात एक जागीच ठार तर दोघे जखमी , “राष्ट्रीय...

कंटेनर – दुचाकीच्या अपघात एक जागीच ठार तर दोघे जखमी , “राष्ट्रीय महामार्गावरील देववाडी नजीकची घटना”

771

इकबाल शेख – वर्धा

तळेगांव (शा.पं.):- नागपुर -अमरावती महामार्गावरील तळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या देववाडी नजीक सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, देववाडी येथील राहुल रामदास डिग्रसे वय २४ वर्ष, मारोती धारपुरे वय २६ वर्ष, गजानन कुमरे वय २४ वर्ष हे तिघे MH 49 AX 7889 क्र. चे दुचाकीने सिडेट कंपनी तळेगांव येथे कामावर जाण्यासाठी निघाले असता यादरम्यान नागपुरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या DN. 09. U 9678 क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला मागावुन धडक दिल्याने दुचाकी कंटेनर खाली येवुन दुचाकी चालक राहुल डिग्रसे याचा जागीच मृत्यु तर मारोती धारपुरे व गजानन कुमरे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची वार्ता देववाडी गावात पोहचतास गावकर्‍यांची घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. गावकर्‍यांनी ताबडतोब जखमींना देववाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले. तळेगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी दिगांबर रुईकर, मनोज आसोले व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अपघातानंतर बराच वेळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावरुन कंटेनर चालकाने पळ काढल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.