Home बुलडाणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दे. माळी ग्रामपंचायतीच्या...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दे. माळी ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य नेत्रदान तपासणी शिबिराचे संपन्न.

372

प्रतिनिधी देऊळगाव माळी (कैलास राऊत)

दि. ८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत देऊळगाव माळी तथा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था देऊळगाव माळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण नेत्रालय औरंगाबाद यांचे मार्फत भव्य नेत्र तपासणी व उपचारशिबिराचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वनाथ बाहेकर तर उद्घाटक म्हणून मुख्य आयोजक सरपंच किशोर भाऊ गाभणे हे होते .

यावेळी औरंगाबाद वरून आलेल्या नेत्रचिकित्सक आदेश मोरे जनसंपर्क अधिकारी विशाल सुरडकर इरफान शेख व मंगेश खरात यांची तपासणी करताना शिबिरार्थींना मदत झाली प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक म .व्ही.गाभणे पांडुरंग संस्थांचे अध्यक्ष तुकाराम मगर सुधाकर काळूसे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कलोरे यांनी तर प्रास्ताविक संजय जाधव यांनी केले आभार योगेश गिर्ह यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश आप्रे सचिन नारखेडे जी.बी. मगर ,ग.ह‌.पिठले, नितीन मस्के ,निलेश गवई, रघूनाथ बळी, यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..