Home विदर्भ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात.

355

एका चा जागीच मृत्यू

रविंद्र साखरे

वर्धा –  तळेगाव शामजी पंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीस्वार जागीच मरण पावला झाला तर दोघे गंभीर जखमी झाले प्राप्त माहितीनुसार नागपुर अमरावती रोड वरील मौजा देववाडी शिवारात दुचाकी स्वार हे तिघेजण तळेगावला मोटर सायकल क्रमांक MH -49 X- 78 89 येत असता देववाडी जवळ मागाहून येणाऱ्या ट्रक क्रमांक DN 09-U-9676 जोरदार धडक दिली त्यात राहुल डिग्रस हा जागीच ठार झाला तर त्याचे मित्र राजू कुमरे ,मारुती धारपुरे,हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने प्रथम उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले तळेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मनोज आसोले , दिगंबर रुईकर घटनास्थळावर पोहचुन पंचनामा केला त्या वेळे पर्यंत ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता पुढील तपास तळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे अपघात एवढा भीषण होता की दुचाकी ही ट्रकच्या समोर भागात आत मध्ये घुसली