Home विदर्भ बातमीदार वा पत्रकारांनी लोकांभिमुख पत्रकारिता करावी..! – पोलीस निरीक्षक मनिष दिवटे

बातमीदार वा पत्रकारांनी लोकांभिमुख पत्रकारिता करावी..! – पोलीस निरीक्षक मनिष दिवटे

353

⚫➡️ घाटंजी पोलीस ठाण्यात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा..!

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी / यवतमाळ – पत्रकार हा समाजाचा, लोकशाहीचा महत्वाचा घटक असल्यामुळे समाजात घडणाऱ्या सर्वच बाबीवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागत असून प्रसंगी अन्याया विरोधात लढण्याची तयारी ठेवावी लागते त्यामुळे पत्रकारांनी लोकांभिमुख पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांनी केले. घाटंजी पोलीस ठाण्यात आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.
➡️ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कैलास कोरवते आदीं मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन घाटंजी पोलीस स्टेशन गोपनीय शाखेचे वामन जाधव यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने केले होते, हे विशेष.
➡️ पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण म्हणाले की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार असला तरी बाकी तीन स्तंभ जसे मजबूत आहे, त्या तुलनेत मात्र पत्रकार हा निराधार असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्याच प्रमाणे शासनाकडून मिळणाऱ्या सोयी, सवलती कशा पद्धतीने पत्रकारांनी प्राप्त करून घ्याव्यात या बाबतीतही त्यांनी योग्य असे विश्लेषण केले.
➡️ या प्रसंगी घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे यांचा सत्कार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, तर घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कैलास कोरवते यांचा सत्कार घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महेंद्र देवतळे व कैलास कोरवते यांनी आपले मनोगत व्यक्त करुन ठाणेदार मनीष दिवटे यांचेसह घाटंजी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, जमादार, पोलीस शिपाई, गोपनिय शाखेचे वामन जाधव आदींचे विशेष आभार मानले.
➡️ विशेष म्हणजे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार (PI) मनीष दिवटे हे LLB असुन, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार (API) विनोद चव्हाण हे LLM म्हणजेच अधिवक्ता असुन कायदेतज्ञ आहे, हे येथे उल्लेखनीय.
➡️ या वेळी लोकसुत्रचे चंद्रकांत ढवळे, लोकमतचे सुधाकर अक्कलवार, मातृभूमीचे गणेश भोयर, पुण्यनगरीचे अनंत नखाते, सकाळचे पांडुरंग निवल, दिव्य मराठीचे संतोष अक्कलवार, लोकदुतचे संतोष पोटपिल्लेवार, नमो महाराष्ट्रचे अरुण कांबळे, तरुण भारतचे मुकेश चिव्हाणे, शेखर पलकंडवार, नवभारतचे असलम कुरैशी, मतदारचे कज्जुम कुरैशी, लोकमत समाचारचे विकी ऊर्फ विवेक अक्कलवार, अमोल नडपेलवार, मलैया खंडारे, सकाळचे सागर सम्मणवार, अमोल मोतेलवार, टी. व्ही. चँनलचे योगेश ढवळे, कुणाल तांगडे व निखिल गिरी यांचाही घाटंजीचे ठाणेदार मनीष दिवटे व पारवाचे ठाणेदार विनोद चव्हाण आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गणेश भोयर यांनी केले. तर आभार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार (API) विनोद चव्हाण यांनी मानले.