Home विदर्भ आमदार दादाराव केचे यांनी केली नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी

आमदार दादाराव केचे यांनी केली नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी

137

चना, तुर, गहू, भाजीपाला पिकाला 50 हजार रुपये तर संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये भरपाई देण्याची मागणी

इकबाल शेख. – वर्धा
आष्टी(शहीद):- काल दुपारी आष्टी (शहीद), कारंजा (घाडगे) व आर्वी तालुक्यात सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने संत्रा, हरभरा, गहू, भाजीपाला व तुरीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतात पिकाची पाहणी आज आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.

आष्टी तालुक्यातील खडकी येथील शेतकरी राहुल खैरकार, रवी नागपुरे, नंदकिशोर नागपुरे, परसोडा मौजा मधील शेतकरी सुभाष कांडलकर, जयेश गोरे यांच्या शेतामध्ये आमदार दादाराव केचे यांनी प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शासनाकडे गहू, चना, तूर व भाजीपाला पिकांना हेक्टरी 50 हजार, संत्रा फळबाग हेक्‍टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सतीश सांगळे यांनी सांगितले की, आष्टी तालुक्यात 500 हेक्टर, कारंजा तालुक्यात 500 हेक्टर तर आर्वी तालुक्यात 100 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून या सर्व नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

आमदार दादाराव केचे यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये नायब तहसीलदार काळोसे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, कृषी सहाय्यक यु. व्ही. चौरीपगार, सिमोन घागरे, मंडळ कृषी अधिकारी एस.टी.सरोदे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश नागपुरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आवेझ खान, लहानआर्वी चे माजी सरपंच सुनील साबळे, परसोडा सरपंच छत्रपती रावळकर, यांच्यासह खडकी व परसोडा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.