Home विदर्भ पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथे भव्य श्रामणेर शिबीर..!

पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथे भव्य श्रामणेर शिबीर..!

311

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – जागतिक बौध्द धम्मध्वज दिना निमीत्य पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथे अखिल भारतीय भिक्खु संघाच्या विद्यमाने 7 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत पांच दिवसीय श्रामणेर दिक्षा व धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन पाथरी गावातील ऊपासक, ऊपासीका आदींच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराचे आयोजन व मार्गदर्शन यवतमाळ जिल्ह्याचे सचिव भदंत अश्वजित थेरो यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले.
🔵 सदर शिबीरात तरुण युवक, प्रौढव्यक्ती तसेच तेरा ते विस वर्ष वयोगटातील मुलांनी मोठ्या ऊत्साहाने सहभाग घेऊन या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीरासाठी पाथरी गावातील महिला, पुरुष व तरुण युवतींनी तनमन धनाने सहकार्य करुन पुण्य संपादन करण्याचा सफल प्रयत्न केला आहे. या शिबीराचे आयोजन व मार्गदर्शन अखील भारतीय भिक्खु संघ यवतमाळ जिल्ह्याचे सचिव भदंत अश्वजीत थेरो (ता. आर्णी) यांनी फार ऊत्कृष्टपणे पार पाडले. या कार्यक्रमाचा समारोप 11 जानेवारी रोजी करण्यात आला.