*प्रशांत ढोरे पाटील व स्वप्निल तायडे यांना ‘कोरोना योद्धा’ “विशेष सेवा पुरस्कार” प्रदान*
*आजी आमदार व माजी आमदारांच्या पत्नीकडून तंतोतंत सोशल डिस्टनसिंगच पालन*
बुलडाणा ,
दि.९ जानेवारी रोजी चिखली येथील मीरा सेलिब्रेशन येथे बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा व जेष्ठ सभासदांचा गौरव आयोजित करण्यात आला.
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सर्व केमिस्ट बांधवानी दिलेली सेवा अमूल्य आहे त्यामुळे सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला ,कोरोना काळात विशेष कामगिरी बद्दल विदर्भात सर्वात प्रथम सॅनिटायझर फक्ट्री सुरू करणे,रुघ्नांसाठी नोन यु सिड्स कम्पनीतर्फे व्हेंटीलेटर व इतर साहित्य उपलब्ध करून दिल्या बद्दल, परराज्यातील मयत कोरोना रुगणांचा अंत्यसंस्कार करणे, कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव असतील,पत्रकार बांधव असतील,वकील बांधव असतील,शासकीय कोव्हिडं सेंटर मधील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांच्या सह कोव्हिडं रुघ्नांसाठी विशेष सेवा पुरवल्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव प्रशांत ढोरे पाटील व चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी चिखली परिसरासह जिल्ह्याभरातील कोरोना रुगणांना रेमडीसीव्हेर,ऍक्टिमेरा इंजेक्शन सह इतर कोरोना प्रतिबंधित साहित्य उपलब्ध करून दिले व आवश्यक औषधींचा पुरवठा जण सामान्यांपर्यंत अखंडित सुरू ठेवला सर्वत्र लॉकडाऊन असतांना देखील चोविस तास ना नफा ना तोटा या तत्वावर औषधी पुरवठा सुरू ठेवला यासाठी त्यांना बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सपत्निक कोरोना योद्धा विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला यांच्यासह चिखली शहर व ग्रामीण भागातील केमिस्ट बंधूनी देखील कोरोना काळात पुरेपूर सेवा दिल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला खास करून जेष्ठ सभासदांचा देखील गौरव करण्यात आला,पि एच डी प्राप्त केल्या बद्दल दिनेश घुबे व अभय साखरे यांचा व एम बि बि एस ला नंम्बर लागल्या बद्दल वरून शर्मा व वत्सल शर्मा यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे मानद सचिव अनिल भाऊ नावदंर तर विशेष उपस्थिती म्हणून चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले पाटील व हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा वृषाली बोन्द्रे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती एम एस सि डी ए अमरावती झोनचे संघटन सचिव रामचंद्र आयलानी,बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार,सचिव गजानन शिंदे,सहसचिव प्रशांत ढोरे पाटील,एफ डी ए चे औषध निरीक्षक गजानन घिरके, जिल्हा सांस्कृतिक विभागाचे सदस्य गणेश बंगळे,आमंत्रित सदस्य विनोद नागवाणी,चिखली शहराध्यक्ष स्वप्नील तायडे होते ,आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल नावदंर यांनी महत्वपुर्ण मार्गदर्शन केले तर श्वेता महाले पाटील व वृषाली बोन्द्रे यांच्या सह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,सदर कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट व चिखली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील पारस्कर,जयंत शर्मा,ता, उपाध्यक्ष बद्री पानगोळे,दिपक खरात,सचिव गजानन भुते,रामा खंडागळे ,सचिन जगताप, नंदीप वाघमारे, विजय डुकरे,भरत खंडागळे,स्नेहल वानखेडे,तुषार पाटील,शरद चिंचोले, योगेश सोळकी, प्रणव लधड,आशीष भालेराव,श्रीकांत सोलनकी,विजय सवडतकर,विजय वायाळ,राहुल सावजी, आदिंनी परिश्रम घेतले,याप्रसंगी प्रकाश मेहत्रे,राजेंद्र व्यास,जनार्दन घुबे,हनुमंत भवर,सुबोध सराफ,श्रीराम उनोने,विलास खेडेकर,नसवाले काका,समदानी काका,मदन दुसाद,दिनेश घुबे,अभय साखरे,शहराध्यक्ष बुलढाणा केमिस्ट राजेश पाटील,गजानन दिवटे आदींची उपस्थिती होती खास म्हणजे यावेळी विध्यमान आमदार श्वेता महाले पाटील व माजी आमदार यांच्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांनी स्टेज वर देखील तंतोतंत सोशल डिस्टनसिंगच पुरेपूर पालन करतांना दिसल्या, सूत्रसंचालन जयंत शर्मा व गणेश धुंदले यांनी तर आभार प्रदर्शन सुचित भराड यांनी केले,