🔵 घाटंजी पोलीस ठाण्यात गाडी मालक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – निष्काळजी पणाने वाहन चालवुन घाटंजी येथील दैनिक लोकदुतचे तालुका प्रतिनिधी संतोष पोटपिल्लेवार यांस धडक देऊन जखमी केल्या प्रकरणी संतोष पोटपिल्लेवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 279, 337 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे. सदर घटना रविवारी चार वाजताच्या सुमारास घाटंजी येथील ममता साडी सेंटर जवळ घडली आहे. संतोष पांडुरंग पोटपिल्लेवार (वय – 47) रा. घाटी – घाटंजी असे फिर्यादीचे नाव असून, एम. एच. 29 / बी. व्ही. 0750 क्रमांकाच्या चालकाने चारचाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाणे चालवून पोटपिल्लेवार यांस पाठीमागून धडक दिली. यामध्ये फिर्यादीच्या पायाला दुखापत होउन पाय फ्रॅक्चर झाला आहे, असे वैद्यकीय तपासणी अहवालात म्हटले आहे. या बाबत संतोष पोटपिल्लेवार याने घाटंजी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणात घाटंजी पोलीसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे करित आहे.