प्रतिनिधी
आयुष्यभर शेतात राबराब राहणाऱ्या शेतकर्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वतःच्या शेतातील लाकडे चिता पेटविण्यासाठी मिळत नाहीत. ती शहरातून विकत आनावी लागतात ही दुर्दैवाची बाब असल्याचं मत ह-भ-प निवृत्तीनाथ महाराज बाबा इसादकर यांनी सोमवारी चुडावा येथे कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.
चुडावा येथील बाबा जमुनादास संस्थानात दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात चौथ्या दिवशी वैकुंठवासी सोपान काका इसादकर यांचे नातू ह भ प निवृत्तीनाथ बाबा इसादकर यांचे कीर्तन झाले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, तुकाराम ढोणे, बापू सातपुते यांची विशेष उपस्थिती होती..या कीर्तनात अभंगाचे निरुपण करताना इसादकर महाराज पुढे म्हणाले की ,सध्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या चितेला अग्नि देण्यासाठी शहरातून लाकडे आणावे लागतात. ही शेतकऱ्याच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. या प्रक्रियेला रोखण्यासाठी प्रत्येक शेतकरी आई वडिलांनी आपल्या मुलाकडे मी मेल्यानंतर मला स्वतःच्या शेतातील लाकडात जाळा, अग्नी द्या असा आग्रह धरावा. आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलं आपल्या शेतातील बांधावर, पडिक जमिनीत, नदीकाठी झाडे लावतील. आणि आई-वडिलांची इच्छा म्हणून ते जोपासतील.त्यामुळे सध्या आपल्या भागात ओसाड असलेला भाग नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. उपदेश मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण तो उपदेश करण्याच्या ही काही पद्धती आहेत. उपदेश का, कोणी , कोणाला व कोणत्या वेळी करावा या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत . किर्तन ऐकण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या संस्थानचे मठाधिपती जीवनदास बाबा यांच्या नियोजनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.