Home महाराष्ट्र मुंबईत मैत्रेय गुंतवणूकदारांचे आंदोलन चिघळले पोलिस प्रशासनाने मंत्रालयासमोर निदर्शनेकर्त्यांना उचलून उपोषणस्थळी हलविले

मुंबईत मैत्रेय गुंतवणूकदारांचे आंदोलन चिघळले पोलिस प्रशासनाने मंत्रालयासमोर निदर्शनेकर्त्यांना उचलून उपोषणस्थळी हलविले

264

लक्ष्मण बिलोरे

मुंबई , दि. २७ :- आज सोमवारी दि. २७ जानेवारी रोजी,मंत्रालय मुंबई प्रवेशद्वारावर दुपारी १ वाजताच्या दरम्यान उपोषणकर्त्यांन कडून तुफान निदर्शने केल्या गेली एकच कल्लोळ झाला. मंत्रालय पोलिसांनी उपोषण करताना ताब्यात घेऊन उपोषण उपोषणस्थळी आजाद मैदान येथे सोडण्यात आले.
महाराष्ट्र मैत्रेय ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती , अमरावती यांचा मैत्रेय ग्राहकांचे पैसे परत मिळण्यासाठी संघर्ष सुरूच आज पाचव्या दिवशी पण उपोषण सुरू आहे .अत्यंत दयनीय अवस्थेत हा लढा गुंतवणूकदारांचा आहे . महीला गुंतवणूकदारांचे अक्षरशः हाल होत आहेत. गुंतवणूकदारांची उपोषणस्थळी, उपोषण करते यांच्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील सुरुवातीला दोन दिवस उपस्थिती होती .

परंतु मुंबईतील वातावरण कडाक्याच्या थंडीत महीला गुंतवणूकदारांना त्रास असह्य झाल्याने महीला गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. राज्यभरातील मैत्रेय गुंतवणूकदार येथे आझाद मैदानावर उपोषणाला दाखल होत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री , गृहमंत्री , दौऱ्यावर असल्याने मंत्रालयातील कुणीही जबाबदार व्यक्ती मैत्रेय गुंतवणूकदारांना सामोरे येत नसल्याने तसेच प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळी फिरकत नसल्याने मैत्रेय गुंतवणूकदार सैरभैर झाले आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नक्किच काहीतरी निर्णय घेतला जाईल या आशादायी विचाराने मैत्रेय गुंतवणूकदार उपोषण स्थळी तळ ठोकून आहेत.