रवींद्र साखरे
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात बाबतीत दाखल गुन्ह्याचा तपासात गर्भपाताचे प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई व वडिलांसह अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणारी डॉ. रेखा कदम आणि २ परिचारिका अशा ५ जणांना पोलिसांनी अटक झाली. याच प्रकरणात डॉ. नीरज कदम याला आर्वी पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती. रेखा कदम हिच्या पोलीस कोठडीतील तपासात दरम्यान झालेल्या बयाणावरुन १२ जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी केली. मात्र, याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये १२ कवट्या व ५४ हाडं आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 व 2 वाजताच्या दरम्यान। या प्रकरणात डॉक्टर रेखा कदम चे पती डॉ. नीरज कदमला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात कळविटीची कातडी आढळली हे कातडी आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पंचनामा करून जप्त केली. रुग्णालयात आरोग्य विभागाच्या पथकला काही शासकीय औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केलेले आहे.