Home नांदेड प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना निधीचे वाटप करा –...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना निधीचे वाटप करा – खासदार हेमंत पाटील यांची मागणी.

401

प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

नांदेड , दि : १६ :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहाय्यता म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा होण्यास अनंत अडचणी येत आहेत. याबाबत येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे .
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताची असलेली महत्वाकांक्षी योजना म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीकडे पाहिले जाते आर्थिक अडचणीत आणि नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. परंतु मागील बऱ्याच दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर , आणि महागाव , उमरखेड तालुक्यातील शेतकरी ९ व्या हप्त्यापासून वंचित असल्याच्या अनंत तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या त्यावर तातडीने कारवाई करत खासदार हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करून याबाबतच्या सर्व अडचणी तात्काळ सोडविण्याचे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्याचे निर्देश दिले आहेत . या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६००० हजार रुपये जमा केले जातात . ९ ऑगस्ट २०२१ रोजी जमा करण्यात आलेली रक्कम हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी बँक खाते क्रमांक चुकीचे आहेत तर काही शेतकऱ्याचे आधार लिंक नसल्याने निधी जमा होण्यास अडचणी निर्माण होऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणूनच खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत खंबीर भूमिका घेऊन महसूल , कृषी आणि ग्रामविकास विभागांने याबाबतच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी केली आहे .