Home अकोला अकोला पोलिसांनी ४८ तासात केला खुनाचा उलगडा

अकोला पोलिसांनी ४८ तासात केला खुनाचा उलगडा

395

 

 

मृतक बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी ,

अमीन शाह ,

अकोला जिल्सह्यात येत असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव ते डोनगाव रोडवर येत असलेल्या जंगलात अज्ञात व्यक्तीचा मुतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती पोलीस अज्ञात खून झालेल्या इसमाचा व आरोपींचा शोध घेत होते तपास सुरू असताना सदर इसमाची हत्या केल्याचे समोर आले मात्र पोलिसां जवळ कोणताच सुगावा नसतांना अकोला स्थानिक गुन्हे शाखा तसेच चान्नि पोलिसांनी अत्यन्त शिताफीने तपास करून या खून प्रकरणातील आरोपीस 48 तासाच्या आत जेरबंद केले आहे

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिस स्टेशन च्या हद्दीत ११ जानेवारी रोजी एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची महिती पोलीसांना मिळाली होती त्या नंतर चांनी पोलीस स्टेशन चा ताफा घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवून मृतक इसम नेमका कोण व कुठला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात करीत असताना सदर इसम हा बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या मेहकर तालुक्यातील सेंदळा येथील सदाशिव तुळशीराम पवार असल्याचे निष्पन्न झाले. शेतात पिकाची पाहणी करण्यास गेलेले सदाशिव पवार हे घरी परतले नसल्याने या विरोधात डोंनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला होता. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सदर इसमाची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्या द्वारे तपास करण्यास सुरुवात केली पोलीस सदर प्रकरणाचा तपास करीत असतांना पोलीस तपासात तीन व्यक्ती शेतात सदाशिव पवार यांना भेटण्यास आल्याचे सदाशिव पवार यांच्या मुलीने पोलिसांना सांगितले याच माहितीच्या आधारावर अकोला स्थानिक गुन्हे शाखा तसेच चांनी पोलीस यांनी सदर प्रकरणात कुठलाच पुरावा सुगावा नसताना सदर प्रकणाचा तपास करून या मधील दोन आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे तर अध्याप पर्यंत एका आरोपीचा पोलीस शोध घेत असून असून सदर हत्या ही गुप्तधन सोन्याच्या आमिषाने झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षका मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली ,