सातत्यपूर्ण सहज शिक्षण शाळेचा पाचवा रविवार
रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड येथून सुरुवात झालेली वीटभट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी सुरू झालेली शाळेत मदतीसाठी आता समाजातील विविध घटक समाविष्ठ होत आहेत.
दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी बरेच विद्यार्थी अनवाणी शाळेत येत असतात. ही बाब लक्षात घेऊन शीळफाटा येथील उद्योजक सत्यम चंपकलाल ओसवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना चप्पल पुरविल्या.खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व उद्योजक सत्यम ओसवाल यांचे कुटुंबीय यांनी विद्यार्थ्यांना चप्पलचे वाटप केले. इशिका शेलार,नकुल देशमुख,जयश्री भागेकर,अखिलेश पाटील व बी.निरंजन यांचे शिक्षकरूपात सातत्यपूर्ण अमूल्य योगदान लाभत आहे.
यावेळी चंपकलाल ओसवाल,मनीषा ओसवाल,मित ओसवाल,मैत्री ओसवाल, युवान ओसवाल, टीचा ओसवाल, प्रवीण वाघमारे, सहजसेवेच्या सचिव वर्षा मोरे, बंटी कांबळे, निहारीका जांभळे व खालापूर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक उपस्थित होते.
सुमारे 100 विद्यार्थी असणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उमटणारे हास्य प्रसन्नतेचे बळ व समाधानाचे बळ देते.लवकरच सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत तसेच सातत्यपूर्ण चालणाऱ्या या सहज निसर्ग शाळेत मनःपूर्वक योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार…
*धन्यवाद*
*डॉ. शेखर अलका तुळशीदास जांभळे*
( संस्थापक-अध्यक्ष )
*सहजसेवा फाउंडेशन*
( सहज साद, सहज साथ )
( *IEA BOOK OF WORLD RECORD,महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड* मध्ये सामाजिक उपक्रमासाठी नोंद असलेली संस्था… )
( प्रत्येक मदत निधीत इन्कम टॅक्स अधिनियम 80 G अनवये करात सूट
या व्यतिरिक्त आपण या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता )
*www.sahajsevafoundation.com*