अमरावती मध्ये राजापेठ उड्डानपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे अमरावती महानगरपालिका आयुक्त यांच्या पुतळा जाळन्यात आला
रानादाम्पंत्याचा घरासमोर पोलीस सांचा तगळा बंदोबस्त लावन्यात आला त्यांना पुर्ण दिवसभर नजरकैदेतठेवन्यात आले.
मनिष गुडधे
अमरावती – युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवि राणा आणि खासदार सौ. नवनीत राणा हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कामांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी शहरामधील राजापेठ येथील उडाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, यावेळी शहरातील वातावरण चांगलेच तापले होते कारण हा पुतळा बसविताना प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती; हा पुतळा प्रशासनामार्फत हटविल्या जाणार हे सर्वश्रुत असल्याने त्या ठीकाणी रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गर्दी जमा होत होती.काल रात्री उशिरा पोलीसांचा मोठा ताफा राजापेठ उडाणपुलावर पोहचला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सावधानगिरी बाळगत आ. रवि राणा यांना त्यांच्या शंकर नगर येथील गंगा सावित्री या निवासस्थानी नजर कैदेत ठेवण्यात आले. रवि राणा यांच्या घराला सध्या पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.दरम्यान युवा स्वाभीमान पक्षाचे कार्यकर्तेसुध्दा रवि राणा यांच्या घराबाहेर जमा झाले आहेत; तणावाची परीस्थिती निर्माण होऊ नये याकरीता पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.पुतळा बसविल्यानंतर परवानगी मिळवण्याकरिता आ. रवि राणांनी महानगरपालिकेमध्ये बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीनंतर परवानगीबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने आता पोलीस प्रशासनामार्फत हा पुतळा हटविण्यात आलेला आहे.हा पुतळा हटविल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रीया पहायला मिळाल्या आहेत. तर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीसांवर दबाव टाकुन हा पुतळा हटविण्यास भाग पाडले असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.