बलडाणा जिल्हाध्यक्षपदी गणेश डोके तर देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी शेख कदीर शेख चाँद यांची निवड
प्रतिनिधी ( रवि अण्णा जाधव )
देऊळगावराजा:- समाजातील उपेक्षित घटकांना व पत्रकारांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कार्यरत आहे. या पत्रकार संघाची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी व देऊळगावराजा तालुका कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली.
पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय महासचिव विनोद पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी गणेश डोके, उपाध्यक्षपदी सय्यद गफूर सय्यद कासम, सचिवपदी अतिष हांडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी देऊळगावराजा तालुक्याची कार्यकारिणीही गठित करण्यात आली. देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी शेख कदीर शेख चाँद, उपाध्यक्षपदी राहुल नायर, सचिवपदी विजय बोरकर, कोषाध्यक्षपदी संतोष वासुंबे, कार्याध्यक्षपदी समाधान देवखाने, संघटकपदी प्रकाश बस्सी तर सहसचिवपदी पवन शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने व राष्ट्रीय महासचिव विनोद पवार यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.