मुंबई ( प्रतिनिधी ) – दिनांक १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संरक्षण समिती मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जनआधार टाइम्सचे संपादक व निर्भीड,डॅशिंग पत्रकार निलेश हरिश्चंद्र धुरी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष पत्रकारांवर होणार्या अन्याया विरोधात आवाज उठविणारे पत्रकारांना नेहमी मदत करणारे रवि गवळी,मुंबई प्रदेश महासचिव तरुण,तडफदार पत्रकार सिद्धार्थ काळे यांनी नियुक्तीपत्र देऊन निलेश धुरी यांची नियुक्ती केली व पुढील त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निलेश धुरी यांनी दुग्ध खात्यातील करोडो रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे.निलेश धुरी यांच्या निर्भीड पत्रकारितेतमुळे त्याना अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत तसेच 20 ते 25 गुंडांनी धुरी यांच्या घरावर हल्ला देखील केला होता.भ्रष्ट अधिकार्यांनी सुडभावनेने आरे वसाहतीतील त्यांचे कार्यालय देखील तोढले.तसेच नुकतेच त्यांना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व भूमाफियांनी एका खोट्या गुन्ह्यात देखील अडकविले आहे असे असताना देखील धुरी अजून भ्रष्ट सिस्टीमसोबत लढतच आहेत.येणाऱ्या काळामध्ये जनमानसाच्या,पीडितांच्या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी निर्भीड निष्पक्षपणे निलश धुरी हे लढतील व पत्रकाराच्या हितासाठी नेहमी धावून जातील असे प्रतिपादन रवि गवळी यांनी यावेळी केले.
निलशे धुरी हे नेहमी पत्रकाराच्या विविध विषय घेऊन लढत असतात.पुढील काळामध्ये देखील लढतील असा विश्वास आहे.धुरी यांच्या बातम्यांमुळे भ्रष्टाचार करणार्यांचे धाबे दणाणले असून आता पत्रकार संरक्षण समिती त्याच्यासोबत असून आम्ही देखील त्यांना सर्वतोपरी मदत करणारा असे सिद्धार्थ काळे यांनी सांगीतले.
संस्थेचे कायदेशीर सल्लागार जय भारत तिवारी यांनी देखील निलेश धुरी व संघटनेतील सर्व पत्रकारांना योग्य कायदेशीर मदत करणार असे आश्वासन दिले.