जळगाव:(एजाज़ गुलाब शाह)
एन. डि. टि.व्हि चे वरिष्ठ पत्रकार वय ६१ वर्ष यांच्या अकाली निधना वर जळगाव येथील खान्देश उर्दू कान्सिल ने श्रद्धांजली अर्पण केली कमाल खान हे मागिल २२/२३ वर्षां पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. एक निष्पक्षपाती, निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची नावलौकिकता होती. नेहमी त्यांनी फिल्डवर कार्य करणे पसंत केलं. जन सामान्यांचे मुद्दे, दुर्लक्षित, उपेक्षित समाजा चे प्रश्न मांडने न्याया साठी प्रयत्न करणं हे त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्टये होती. त्यांच्या निधनाने जी निर्भिड व निपक्षपात पत्रकारितेची पोकळी निर्माण झाली आहे ती लवकर भरने कठीण आहे अशी भावना खान्देश उर्दू कान्सिल चे अध्यक्ष उर्दू पत्रकार प्रा. अकिल खान सर ब्यावली, सचिव सईद पटेल,को आरडीनेटर नौशाद हमीदने व्यक्त केली.