प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
नांदेड/नायगाव,दि,१७ :- येथील (MIDC) मधील शिट्रस कंपनी बंद करण्यात येत आहे. त्याविरोधात CITU या युनियनचे कर्मचारी, कामगार उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्या कामगारांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी वसंत सुगावे पाटील यांनी कंपनीचे व्यवस्थापक श्री मोरे यांच्याशी संपर्क करून उपोषण करत असलेले कंपनीचे स्थायी (Pramanat) कर्मचारी यांचा थकीत असलेला पगार, पी एफ रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी तसेच ही कंपनी बंद होत असल्याने 60 ते 70 कर्माचार्यानावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवून द्यावी याबाबत वसंत सुगावे पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली. यामागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास कंपणीविरोधात आक्रमकतेने आंदोलन करू असे सांगितले. हे कामगार नायगाव तालुक्यातील असून हे या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. तसेच या कामगारांच्या मागण्यासंदर्भात कामगार मंत्री मा. ना. नवाब मलिक ,व कामगार आयुक्त यांची भेट घेऊन या कामगारांना अन्यत्र नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. असेही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी सांगितले.या वेळी श्यामसुंदर पा.ढगे (तंटा मुक्ती अध्यक्ष घुंगराळा)माधवराव पा.ढगे(शालेय शिक्षण समिती अध्यक्ष) शिवाजी पा.ढगे,(माजी उपसरपंच) राम पा.सुगावे,श्याम यमलवाड, मुरारी तुरटवाड,विलास पा.ढगे,राजेश पा. ढगे,योगेश पा.ढगे,सोहेल शेख उपस्थित होते.