या अनाथ मुलींच्या आदर्श विवाहाची सर्वदूर चर्चा…
रावेर (शेख शरीफ)
रावेर शहरातील इमामवाडा येथील रहिवासी दिवंगत युसुफ खान लसुन व्यवसाय करणारे यांच्या दोन नात ( अनाथ ) फरहीना रईस खान आणि शिफा फरहीन रईस खान या दोन्ही मुलींचा साखरपुडा भुसावळ येथील नवरदेव शेख यासीन शेख अब्दुल गफार, व रावेर येथील नवरदेव शेख उमर शेख इस्माईल यांच्याशी होणार होता.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. साखरपुड्याचे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भुसावळ व रावेर येथील आलेले नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांन यांच्याकडे साखरपुडा ना करता थेट लग्न करून घ्यावे अशी विनंती केली व दोन्ही कडच्या नातेवाईकांच्या विनंतीस मान देऊन इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकविण्यास अनुसरून लग्न समारंभ हा साध्या पद्धतीने करावे ही शिकवण दिली आहे.
वरपक्षाची विनंतीस मान देऊन साखरपुडयातच लग्न लावून देण्यास होकार दिला. व समाजात नवीन आदर्श निर्माण केला या आदर्श विवाह सोळा साठी शहरातील युवा मंडळी,धार्मिक संघटन व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. व हा आदर्श विवाह सोहळा इमामवाडा जामा मस्जिद येथे पार पडला .
अनाथ मुलींचे कासोदा येथील नातेवाईकांनी व हाजी सत्तार पटे वाले यांनी सहकार्य केले. यावेळी रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, मौलाना शोएब साहब ,नगरसेवक आसिफ मोहम्मद, अय्युब मेंबर, डॉक्टर शब्बीर ,डॉक्टर हबीब, फिरोज खान ,शफी सर, सरफराज सर, अब्दुल समद, आरिफ शेख इमरान मोहम्मद ,नजमुद्दिन सेठ रऊफ खान, रियाज मोहम्मद, वसीम खान, आमिर शेख, शेख जाकीर उर्फ राजू भाई आदी उपस्थित होते.