जिल्हा परिषद शाळा येवती येथे ऑनलाईन बालसभा संपन्न.
धर्माबाद: ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जन्मदिन, राजमाता जिजाऊ जन्मदिन, स्वामी विवेकानंद जन्म दिन(युवक दिन) इयत्ता ७ वी ची बाल सभा घेऊन साजरी करण्यात आली. या बाल सभेचे अध्यक्षा इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. रोशनी बोईनवाड ही होती. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक लाभलेले जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील गाडीवान हे होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी पडोळे व कु.संजीवनी कौडकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या केले.या कार्यक्रमात कु. धनश्री भोसले ,कु.लक्ष्मी कासेवार, कु.शितल पांचाळ, कु.दुर्गा मरकंटी, कु.अंजली सोनटक्के, कु.आरती कौडकर व गजानन पेंडकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले ख्यातनाम वक्ते श्री शिवराज पाटील गाडीवान यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर विवेचन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,” जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संकटाला छाताडावर झेलून धैर्याने काम केले पाहिजे “व नियमितपणे अभ्यास करावा”. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवी चे विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक श्री शिवकुमार पाटील यांनी केले.