आठ दिवसात रस्ता ऊखडला , “सर्वात पुढे महाराष्ट्र माझा”
देवानंद जाधव
यवतमाळ – आर्णि तालुक्यातील तरोडा ते गणगाव या तालुका सिमा रस्त्याची सुधारणा नुकतीच करण्यात आली.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. माञ रस्ता निर्मितीचे सारे मापदंड बासनात गुंडाळून ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे.
निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन तरोडा ते गणगाव रस्त्याकडे पाहीले जाते. ५.५० एकुन लांबी असलेल्या या रस्ता डांबरीकरणासाठी ३३२.६१लाख रुपयाचा निधी राज्य शासनाच्या ग्रामविकास मंञालयाने ऊपलब्ध करुन दिला आहे. शिवाय २३.२८लाख रुपयाचा निधी रस्ता निर्मिती पासुन पुढील देखभाल दुरुस्ती साठी दिल्या जाणार आहे.
डांबरीकरणासह रस्ता सुधारणेचा कालावधी २८ऑगस्ट २०१८ ते २७ ऑगस्ट २०१९ असा होता. आणि देखभाल दुरुस्ती २८ऑगस्ट २०१९ ते २७ ऑगस्ट २०२४ असा करारनाम्या नुसार कालावधी होता. माञ गत पंधरवाड्यात या रस्त्याचे थातुरमातुर डांबरीकरण करुन, ठेकेदाराने किंबहुना पुसद येथील बि.के. क॓स्ट्रक्शन क॓पनीने कार्यकारी अभियंत्यांना हाताशी धरुन शासनाची तिजोरी लुटली आहे. तरोडा ते गणगाव रस्ता निर्माण करताना केवळ एकसव्वा ईंच डांबरयुक्त मसाला वापरण्यात आला आहे. समोर डांबरीकरण आणी मागुन रस्ता ऊखडत जात आहे.
गाई म्हशीच्या खूरांनी सुध्दा रस्ता ऊखडत असल्याने या रस्त्याच्या गुणवत्ते संदर्भात परिसरातील जनतेच्या मनात प्रचंड संशय निर्माण झाला. आहे. अत्यंत निकृष्ट अशा प्रकारचे काम करुन अपहार करणा-या पुसदच्या बि.के कंस्ट्रक्शन कंपनीची बारकाईने चौकशी करावी, आणी सदर डांबरीकरणाचे देयक, गुणनियंञण विभागाकडुन सखोल चौकशी होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये, अशी तरोडा,गणगाव, देऊरवाडी परीसरातील जनतेची मागणी आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधीकारी यवतमाळ यांनी जातीने लक्ष धेऊन तरोडा ते गणगाव रस्त्याची आकस्मीक पाहणी करावी असी अपेक्षा परिसरातील नागरिकांची आहे.
शिवाय या विभागाचे तथा केळापुर, आरणीचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे या निकृष्ट डांबरीकरणाबाबत काय पाऊल ऊचलतात या कडे सर्व आरणी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.