यवतमाळ / पुसद – पुसद शहरातील मूळचे रहिवासी सैय्यद मुजीबोद्दीन यांची समाजात जनमानसात मित्र मंडळीत खूप चांगली प्रतिमा व प्रतिष्ठा आहे तसेच हे अनेक सामाजिक संघटनेशी सलग असून त्यात पदाधिकारी पद अतिशय प्रामाणिक पणे पार पाडत असते. समाजातील लोक सैय्यद मुजीबोद्दीन यांना मान सन्मानाची वागणूक देत असतात.
पण सण 2014 मध्ये यांच्या बदल दैनिक सकाळ वृत्तपत्रात दिनांक 11 सप्टेंबर रोजच्या अंकात गैर अर्जदारांनी संगनमत करून अर्जदार सैय्यद मुजीबोद्दीन यांच्या विरुद्ध खोटी बातमी बनवून बदनामी कारक मजकूर छापून प्रकाशित करण्यात आला होता.
याबाबत अर्जदार सैय्यद मुजीबोद्दीन सैय्यद हबीबोद्दीन यांनी पुसद येथील विद्यामान न्यायालयात दिनांक 1 ऑक्टोंमबर 2014 रोजी गैरअर्जदार दैनिक सकाळ वृत्त पत्राचे मुख्यसंपादक श्रीराम पवार, प्रकाशक मुद्रक तथा कार्यकारी संपादक शैलेश पांडे रा नागपूर यांच्या सह इतर 1 यांच्या विरुद्ध भा.द.विचे कलम 500, 501, सह 34 अनुसार फौ.मा. का. 428/ 14 दाखल करून गैरअर्जदारावर कार्यवाही करून न्यायाची मागणी केली आहे.
दाखल सदर प्रकरणी यापूर्वी विद्यमान नाययाल्याने पोलीस प्रशासनातर्फे चौकशी अहवाल मागविले होते त्यावेळी पुसद शहर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक गौतम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साक्षदार यांचे बयान नोंदविण्यात आले होते.
सदर दाखल प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणी फिर्यादीच्या साक्ष पुरावासाठी गैरअर्जदारांच्या सोईनुसार न्यायालयात हजर राहण्यासाठी दिनांक 17 जानेवारी 2022 ही तारीख विद्यमान कोर्टानी नेमून दिली होती. दि 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गैरअर्जदारांचे वकील किंव्हा गैरअर्जदार हजर झाले नाही.
शेवटी पुसद येथील ६ वे सह. दिवाणी न्यायालय येथे विद्यमान न्यायाधीश व्ही. एस. वाघमोडे तथा न्यायदंडाधिकारी प्र. वर्ग यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी गैरअर्जदार सकाळ वृत्त पत्राचे मुख्यसंपादक श्रीराम पवार आणि प्रकाशक मुद्रक तथा कार्यकारी संपादक शैलेश पांडे नागपूर यांच्या विरुद्ध गैर जमानती वॉरंट कडून येत्या 21 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश जारी केले. सदर प्रकरणी फिर्यादी तर्फे ऍड जहीर एस खान काम पाहत आहे.