Home बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यातील शाळा स्थानिक परिस्थीतीनुसार किमान ५०% क्षमतेने तात्काळ सुरु करण्यात यावे,

बुलढाणा जिल्ह्यातील शाळा स्थानिक परिस्थीतीनुसार किमान ५०% क्षमतेने तात्काळ सुरु करण्यात यावे,

368

 

जमियते उलमा ए हिंद लोणारची जिल्हाधिकारी बुलढाणा कडे मागणी”

लोणार: सय्यद तौसीफ

राज्यातील शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. सर्वत्र या निर्णयाचा विरोध दिसून येत आहे. जमियते उलमा ए हिंद लोणारच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे सरसकट शाळा बंदचा विरोध करून ५० टक्के क्षमतेने शाळा तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी तहसीलदार लोणार श्री सैफन नदाफ यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे.
दि.१०/०१/२०२२ पासून शाळा पुर्णत: बंद केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिकतेवर विपरीत परिणाम परिणाम होऊन शिक्षणाचे नुकसान होत आहे, सर्वत्र शाळा उघडण्याची मागणी जोर धरत आहे. तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करता ५० टक्के क्षमतेने शाळा तात्काळ सुरू करण्याची मांगणी जमियते उलमा ए हिंद ने केली आहे.
सदरील निर्णयाने गरीब कष्टकरी, विशेषत: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थाचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा जवळपास दोनवर्षा पासून बंदच होते. मागील ०१/१२/२०२१ पासून राज्यातील पहिलीपासुन वर्ग सुरु झाल्याने पालक व विद्यार्थ्यांनमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या मुलभुत शैक्षणिक क्षमता वाढविण्यास मदत झालेली होती. असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षांताई गायकवाड तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, लोणार मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांना सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर जमीयतचे जनरल सेक्रेटरी मोहम्मद रिजवान जड्डा, शहर अध्यक्ष हाफिज शेख अयाज, रिजवान खान करामत खान, सामाजिक कार्यकर्ते रौनक अली, नगरसेवक आबेद खान मोमिन खान, शेख ईक्रामोद्दीन, डॉक्टर सय्यद ताहेर, वसीफ खान मनसब खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.