औरंगाबाद – दिनांक 19 / 01 / 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशनच्या विधी सल्लागार औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी येथील एडव्होकेट सरताज पठाण यांची निवड केल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.
शासकीय विश्रागृहावर झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. B.A. L.L.B. शिक्षण पूर्ण झालेले सरताज पठाण हे सध्या ( Aurangabad high court ) औरंगाबाद उच्च न्यायालयात आपले कामकाज पाहत आहेत. त्यांची सामाजिक कार्यामध्ये असलेली आवड आणि पोलीस बांधवांबद्दल असलेली आपुलकी आणि जिव्हाळा या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची पोलीस बॉईज असोसिएशन मधे विधी सल्लागार विभागाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे.
सरताज पठाण यांच्या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.