Home जळगाव मनीयार बिरादरी ने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

मनीयार बिरादरी ने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

447

जळगाव : (एजाज़ गुलाब शाह )

साखरपुडयाचे लग्नात झालेले विवाह
१) मुंबईहून जळगावला आलेले जावेद हैदर शेख यांनी हाजी गुलामनबी नगर, येथील सादिया जहांगीर खान हिच्या सोबत मस्जिद के अरक़म येथे सतरा लोकांच्या उपस्थितीत विवाह (निकाह) पार पाडून घेतला.


हा विवाह मुफ़्ती हारून यांनी लावून दिला यात माजी न्यायमूर्ती रफिक खान यांनी सादिया खान तर्फे पालकाची (वकील) ची भूमिका निभावली तर साक्षीदार म्हणून जळगावचे उमर फारूक शेख व मुंबईचे अशपाक हैदर शेख यांनी कार्य केले.
२)सोनगीर येथून तोसिफ सय्यद आरीफ हे शिरसोली येथे मारिया बी शेख अन्सार तिच्यासोबत साखरपुड्या साठी आले असता बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख व उपाध्यक्ष सय्यद चाँद यांनी सोनगीर चे ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख ,मुलाचे वडील सय्यद आरिफ व त्यांच्या परिवाराची चर्चा करून मस्जिद ए आयशा शिरसोली येथे सदर निकाह मौलाना वली मोहम्मद यांनी पढविला यावेळी वकिलाची भूमिका शिरसोली चे शेख नबी बिस्मिल्ला तर साक्षीदाराची भूमिका सोनगीर चे सैय्यद शरीफ सैय्यद अब्बास व मालेगाव चे ईसा यासीन मनियार यांनी पार पाडली.
३) पाळधी तालुका धरणगाव येथील सय्यद अनस सय्यद रशीद मन्यार हे गेंदालाल मिल येथील मुस्कान मेहबूब शेख हीला बघण्यासाठी आले त्यावेळी मुस्कान चे मामा रफिक मणियार यांनी मोहम्मदिया नगर येथे त्यांच्या निवासस्थानी मुलाकडील मंडळींना बोलून बिरादरीचे फारुक शेख, सय्यद चाँद,हाजी हसन रसूल, गुलाम बक्ष आदींनी चर्चा करू सदर साखरपुडा लग्नात रूपांतरीत केले.
मोहम्मदीया नगर मधील मस्जिद ए बरकती चे मौलाना इलियास बागवान यांनी साखरपुड्याच्या ठिकाणीच निकाह लावून दिला.
या विवाह प्रसंगी जळगाव मन्यार वाड्यातील शेख हसन रसुल यांनी वकिलाची भूमिका तर पाळधी येथील हुसेन रमजान मणियार व शिवाजीनगर गेंदालाल मधील शेख रशीद अमीर यांनी साक्षीदाराची भूमिका निभावत हे लग्न पार पाडले.
यावेळी सोनगीर चे मुक्तार खा जब्बार खा,पाळधी चे आसिफ शेख,जळगावचे शेख फ़हीम, मुलाची आई फरीदा बी, बहिण फरजाना व मामी रहीमा बी यांची सकारात्मक भूमिका राहिली तर मुली तर्फे साकली येथील आजोबा शेख लतीफ, काका शेख रफिक व अब्दुल रउफ, आई फैमिदा बी यांनी त्यास पाठिंबा देत लग्न लावण्यास बिरादरी ला मदत केली.
४) नशिराबाद येथील कासार गुलाम मुस्तफा अब्दुल मुनाफ हे जळगाव मन्यार वाड्यातील सय्यद मुजफ्फर यांची मुलगी स्वालेहा कासार हिला फक्त सात वराती येऊन निकाह लाउन आज बुधवारी सकाळी रवाना केले.
सदर नीकाह जामा मस्जिद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या हस्ते पार पडला यावेळी वकील म्हणून चाळीसगावचे सय्यद रमजान सय्यद रहीम तर साक्षीदार म्हणून मुंबईचे मुस्‍तकीम बाशीद व दुसरे साक्षीदार नशिराबादचे खुर्शिद रूहउल्लाह यांनी भूमिका पार पाडली.
एकाच आठवड्यात नववर्षाच्या सुरुवातीला अत्यंत साधेपणाने व 50 लोकांच्या संख्येच्या आत सदर साखरपुड्यात चे लग्नात रूपांतर झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील मनियार बिरादरी मध्ये उत्साहाचे वातावरण आहे व सर्वदूर हा प्रयोग अमलात येत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केली.

आवाहन

समाजातील सर्व बिरादरी व मोठ मोठ्या व्यक्तींना नम्र पूर्व आव्हान आहे की त्यांनी आपली मुलं आणि मुलींचे लग्न अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स)यांच्या दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करावी व देशाला, समाजाला एक दिशा द्यावी असे आवाहन यावेळी मन्यार बिरादरीचे सय्यद चाँद, इक्बाल वजीर, फारुक शेख, हारून मेहबूब, सलीम मोहम्मद, सादिक मुसा, ताहेर शेख, रउफ रहीम, अल्ताफ शेख, जुनकरनयन, गुलाम रसूल बक्ष आदींनी केलेले आहे.