Home रायगड मोक्का आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारांकडून खुलेआमपणे खाद्य तेल चोरी...

मोक्का आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारांकडून खुलेआमपणे खाद्य तेल चोरी व भेसळ अड्डा पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणला उघडकिस 

453

ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यतेल विकून त्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळत येत होता – “जिल्हा अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ”

प्रतिनिधी: खालापूर पोलीस ठाणे च्या हद्दीत मोठ्याप्रमाणात खाद्य तेल चोरी व भेसळीचा अड्डा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकिस आणला आहे.

रायगड पोलीस अधिक्षक कार्यालय क्षेत्रातील खालापुर पोलीस ठाणे हद्दी मधील जूना मुंबई-पुणे महामार्ग वरील विणे गाव येथील इंडियन ऑईल पेट्रोलियम पंप लगत न्यू ऋषभ हॉटेल च्या डावीकडील बाजुच्या गल्लीत निळ्या रंगाच्या लोखंडी पत्र्याच्या मोठ्या गोडावून परिसरात खाद्य तेलाची चोरी व भेसळ करण्याचे बेकायदेशीर कृत्ये दिवसा ढवळ्या सुरु होते. माफिया अशोक यादव, प्रकाश देवघरे आणि त्याचे साथीदार, अनैतिक कार्याला जागा भाडे तत्वावर देणारे जागा मालक यांच्या सहकार्याने ठिकाणी काही दिवसांपासून तेल चोरी सुरु होती.

येथील अड्यावर वाहन चालकांच्या संमतीने टँकर, बुलेट टँकर मधील किंमती खाद्य तेल मालांचा फाळका मारत चोरी करण्यात येत असे. चोरण्यात आलेल्या मालांस खोटे बिल्टी चलन सादर करत बाजारत विकण्यासाठी पाठवण्यात येत असे. एकाच पैकिंग मशीन मधून पामतेल, रिफाइंड तेल, सनफ्लॉवर तेल आणि राईस बँड तेल तयार केले जात असून बाजारात त्याची विक्री करण्यासाठी ठेवण्यात येत होते. यामूळे ग्राहकांना खुलेआमपणे भेसळयुक्त खाद्यतेल विकण्यात येवून त्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळण्यात येत होता. येथील अवैध धंद्यावर मोठ्याप्रमाणात खाद्य तेल चोरी व भेसळ प्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा अधिकारी अनभिज्ञ असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तेल माफियांवर अनेक वेळा गंभीर गुन्हे दाखल झाले असून तरीही चोर बक्कळ पैसा मिळविण्याच्या कुटील हेतुने स्वराज ट्रांसपोर्ट च्या आड आपले काळे कृत्ये काही महिण्यापासून करीत होते. अशी माहिती उजेडात आली आहे.
मकर संक्रांत दिवशी दिनांक १४ जानेवारी सायंकाळी ५:१५ वाजता पत्रकारांनी तेल माफिया प्रकाश देवधरे, अशोक यादव (रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पेण पोलिसांनी अनेक गंभीर गुन्हे प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने काही महीने तुरुंगात शिक्षा भोगत होता दहा दिवसांपूर्वी तुरुंगातुन बाहेर आलेला गुन्हेगार) संचालित अवैध तेल चोरी व भेसळ अड्डयावरील चोरी होत असल्याची माहिती जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यापासून स्थानिक पोलीस ठाणे पर्यंत शासकीय अधिकाऱ्यांच्या मोबाईल व कार्यालयात फोन वर देत कारवाई करण्याची विनंती केली. त्यानुसार खालापुर पोलीस ठाणे चे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटना स्थळी असलेला टँकर नं. MH 43 Y 4472 ताब्यात घेत खाद्यतेलाची पावतीची पाहणी केल्यानंतर वजन काटयावर नेवून त्याचे वजन करून खालापुर पोलीस ठाणे आवारात पार्किंग केली गेली. दरम्यान पोलिसांनी खाद्य तेलाने भरलेले २०० लिटर चे १८ ड्रम व ३५ लिटर चे ६ ड्रम आणि इतर साहित्य जप्त करीत पंचनामा केला. खालापुर पोलीस ठाणे पोलिसांनी मोक्का मधील सराईत गुन्हेगार अशोक यादव प्रकाश देवधरे आणि टँकर चालक सोनू बहादुर हरिजन यांस अटक केली.
सदर विषयात खालापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद क्र. १०/२०२२ कलम ३७९, ४११, ३४ नुसार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी नोंद करण्यात आला आहे. मा. न्यायालयात न्यायाधीशा समोर आरोपीतांना उभे केले असता न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहे. अवैध धंद्यास मोठे गोडावून आणि जागा भाडेतत्वावर देणारे जागा मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण भवन, नवी मुंबई; पोलीस अधिक्षक, अलिबाग यांच्याकडे करण्यात आलेली आहे.