महेंद्र गायकवाड
नांदेड – लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील गोदावरी नदी पाञातुन अवैध वाळू उपसा करून जवळपास अडीच हजार ब्रास वाळू साठा वाळू माफिया कडून करण्यात आला होता. या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शेख एजास यानी जिल्हाअधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती की, मौजे येळी ता.लोहा येथील जवळपास अङीच हजार ब्रास अवैध वाळूची चौकशी करण्यात यावी यांची दखल घेत जिल्हाअधिकारी यांनी या कंधारचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी याना चौकशीचे आदेश दिले होते. उपविभागीय अधिकारी कंधार यानी चौकशी केली चौकशी करून अहवाल सादर केले पण चौकशी अहवालात अङीच हजार ब्रास वाळू पैकी फक्त साङेसतराशे ब्रास वाळू दाखवली असून उपभुमीअभीलेख लोहा यानी ईटीएस मोजणीचा अहवाला जवळपास अङीच हजार ब्रास ईतकी वाळु आहे.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शेख एजास यानी विभागीय आयुक्त औरंगाबाद याच्या कङे तक्रार केली होती सदर या प्रकरणात विभागीय आयुक्त औरंगाबाद यानी या प्रकरणात दोनदा जिल्हाअधिकारी नांदेड यांना चौकशीचे आदेश दिले होते तरी काही महीने होऊन सुद्धा आज पर्यंत कोणतेही चौकशी झाली नाही .चौकशी झाली तर आज जवळपास लाखो रुपये शासनाला महसुल प्राप्त होईल आणी शासनाचा फायदा होईल पण आज शासनाचा फायदा करण्यासाठी चौकशी करण्याची गरजेचे आहे .असे सामाजिक कार्यकर्ते शेख एजाज यांचे म्हणणे आहे.