Home जळगाव आरोग्यदूत म्हणून समोर आले नवनियुक्त नगरसेवक जफर शेख…

आरोग्यदूत म्हणून समोर आले नवनियुक्त नगरसेवक जफर शेख…

393

विजयाचा जल्लोष सोडत केली रुग्णसेवा…

रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ चा निकाल आज जाहीर झाला. त्यात विजय होऊन अनेक उमेदवार शहरात जल्लोष साजरा करत होते. त्यातच प्रभाग क्रमांक १४ चे जफर शेख देखील जल्लोष साजरा करत होते. त्यातच एका सहकार्याचा फोन आला व तालुक्यातील लोणवाडी येथील एका लहान बाळाची तब्येत खालावल्याचे कळवताच जफर शेख यांनी जल्लोष सोडून आरोग्य दूत म्हणून थेट हॉस्पिटल गाठले.
एकीकडे निवडून आलेले उमेदवार जल्लोष करताय, तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष सोडून नगरसेवक जफर शेख आरोग्य दूत म्हणून समोर आले.
लहान बाळाची तब्बेत खालावल्याने नगरसेवक जफर शेख व त्यांचे डॉ.कलाम फाऊंडेशन चे नईम खान, समीर पिंजारी, मुंताझिर अहमद यांनी त्या बाळाला मोरया हॉस्पिटलमध्ये भरती केले परंतु तब्बेत अति खालावल्याने डॉक्टरांनी बाळाला जळगाव येथिल हॉस्पिटलला हलविण्याचे सांगितले. त्यावेळी नगरसेवक जफर शेख व डॉ.कलाम फाउंडेशन चे नईम खान बागवान यांनी बाळाला ॲम्बुलन्स करून जळगाव येथील दवाखान्यात घेऊन गेले तर समीर पिंजारी व मंतजिर अहेमद यांनी मदत केली.