Home विदर्भ Police बॉईज असोसिएशन कोअर कमिटी सचिव पदी शाहेद सय्यद यांची नियुक्ती..!

Police बॉईज असोसिएशन कोअर कमिटी सचिव पदी शाहेद सय्यद यांची नियुक्ती..!

145

यवतमाळ – महाराष्ट्र पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी मधे दिनांक 19 / 01 / 2022 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत यवतमाळ येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष शाहेद सय्यद यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

शाहेद सय्यद हे सन 2016 पासून पोलीस बॉईज असोसिएशन मधे प्रामाणिकपणे काम करत असून त्यांनी यवतमाळ मधील पोलीस बांधवांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सन 2016 ते 2018 पर्यंत त्यांनी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सन 2018 ते 2021 पर्यंत त्यांच्यावर विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती, ती पण जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांचे काम बघून व जुने सहकारी असल्यामुळे त्यांची पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी मधे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल यवतमाळ जिल्ह्याला विदर्भात मानाचे स्थान मिळाले असून, शाहेद सय्यद यांच्यावर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातून तसेच जिल्हा पोलीस विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.