Home मराठवाडा महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 2 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 2 लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार – पालकमंत्री अशोक चव्हाण

155

नांदेड, दि. 26 :- ( राजेश भांगे ) :- शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” अमलात आणली आहे. ही योजना साधी, सोपी, सरळ असून पात्र शेतकऱ्यांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज खात्यात थेट देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.

यावेळी महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार अमिताताई चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी मान्यवर पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देवून पालकमंत्री श्री चव्हाण म्हणाले, भारत देश 26 जानेवारी 1950 रोजी एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. त्यामुळे या दिवसाला अनन्यर साधारण महत्व आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमूल्य योगदान लाभले. आपल्याग महान राज्यचघटनेचे महत्वद सर्व नागरिकांना कळावे यासाठी महाराष्ट्रन शासनातर्फे राज्यानतील सर्व स्थातनिक स्वसराज्यज संस्थाेमध्येे “सार्वभौमत्वा सविंधानाचे जनहित सर्वांचे” हा उपक्रम राबविण्या त येत आहे.

महाराष्ट्र राज्याने विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्रज राज्याेच्याी सर्वांगीण प्रगतीमध्येत नांदेड जिल्हहयाने विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

नांदेड जिल्हतयातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयाने यावर्षी आरोग्य सेवेत भरारी घेतली असून यामध्ये 100 एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवरुन 150 एम.बी.बी.एस विद्यार्थ्यांची मान्यडता भारत सरकारकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे, तर यासोबत 35 पदव्युत्तर जागा सुध्दा वाढविण्यात यश आले आहे. या जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे व कॅन्सरचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येतात. अशा रुग्णांसाठी आपल्याच जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाचे कॅन्सरचे निदान सेंटर तसेच ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे प्रस्तांवित आहे. राज्यात चार शासकीय दंत महाविद्यालय असून त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडच्या परिसरात शासकीय दंत महाविद्यालय सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. राज्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे युनिस्को युनिट कार्यान्वित आहे, ही जिल्हययासाठी भुषणावह बाब आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कै. शांताराम सगणे जलतरणीकेचे आधुनिक पध्दतीने नुतणीकरण 1.30 कोटी खर्च करुन करण्यात आले आहे. लवकरच या जलतरणीकेचे नव्याने लोकार्पण होणार आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अतंर्गत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नुतणीकरणासाठी स्टेडियम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे रुपये 3.40 कोटी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नांदेड शहरात प्रतिदिन 220 टन निर्माण होत असलेल्या कचऱ्याचे परिमाण लक्षात घेता महापालिकेच्या मालकीच्या मौजे तुप्पा येथील 9.89 हेक्टर जागेवर अत्याधुनिक पध्दतीने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले.
राज्य शासनातर्फे आज 26 जानेवारी 2020 पासुन ‘ शिवभोजन योजना’ राज्यकभरात सुरु होत आहे. शिवभोजन योजनेतंर्गत भोजनालयात परिपूर्ण अशी थाळी दु. 12 ते 2 या कालावधीत अवघ्याघ 10 रुपयात देण्यानत येणार आहे. यामध्येथ नांदेड शहरामध्येु प्रायोगिक तत्वानवर बस स्थाानक, रेल्वेप स्टेवशन, नवीन मोंढा आणि स्व . शंकरराव चव्हायण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुनपुरी अशा 4 ठिकाणी शिवभोजन योजनेची सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ सर्व गरीब व गरजू व्ययक्तींानी घ्या वा असे आवाहन श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी राज्या शासनाने “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” निर्णय घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्यांच्यां कर्ज खात्यात थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रुपये दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. नांदेड जिल्ह्यात बँकेच्या अहवलानुसार अंदाजे 2 लाख 20 हजार 762 शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मारन निधी योजनेअतंर्गत निश्चीयत उत्प न्नन मिळण्याबकरीता प्रति शेतकरी कुंटुंबाला प्रति वर्षासाठी 6 हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्या्त येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मांन निधी योजनेअतंर्गत जिल्होयातील साडेचार लक्ष कुंटुंबाची माहिती प्रधानमंत्री किसान संकेतस्थाळावर भरण्याबत आली आहे. त्या्नुसार जिल्हरयातील नोंदणी झालेल्याा शेतकरी कुंटुंबाना लाभ मिळण्याणसही सुरुवात झाली आहे.
जिल्हात प्रशासनाच्यान पुढाकाराने काही उल्लेजखनिय उपक्रम जिल्ह्यामध्येी राबविण्याणत आले. त्यांमध्येज कर्करोग जनजागृति व नियंत्रण कार्यक्रम घेण्या त आला. या कार्यक्रमाअंतर्गत 18 लक्ष लोकसंख्येयच्यात सर्वे करण्यागत येऊन कर्करोगाच्याय 12300 संशयित रुग्णाावर निदान व पुढील उपचार करण्याषत आले. तसेच, जिल्हाग प्रशासनाने भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (अलिमको) यांचे समवेत जिल्हययामध्ये‍ 10 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीमध्येर 16 तालुक्यांोमध्येय दिव्यांाग बांधवासाठी व जेष्ठच नागरिकांसाठी कृत्रिम साधनांच्याज वाटपासाठी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामधुन 14 हजार दिव्यांषग बांधवाना या योजनेअंतर्गत लाभ देण्याात आला. यामध्येा व्हीरल चेअर, ट्रायसिकल, स्मायर्ट केन व कृत्रिम अवयवांचे वितरण करण्या त येणार आहे.
जिल्ह यातील रस्यांेणा ची परिस्थिती सुधारण्यामसाठी युध्द पातळीवर काम हाती घेण्याबत आलेले असुन जिल्ह यातील सर्व ग्रामीण रस्यां ना क्रमांक देण्यायचे काम सुरु झाले आहे. जिल्हायातील ‘ इतर जिल्हाण मार्गाचे’ रुपातंरण ‘प्रमुख जिल्हाी मार्गांमध्येर’ करण्यासचे काम हाती घेण्याहत आले आहे. याव्दा रे नांदेड जिल्ह यामध्येह उच्चत दर्जाच्याज रस्याहा मचे जाळे विणण्यारत येणार आहे.
माजी मुख्ययमंत्री स्वरर्गीय शंकररावजी चव्हााण यांचे जन्मतशताब्दी. प्रित्यतर्थ 15 जुलै 2019 ते 14 जुलै 2020 पर्यंत विविध कार्यक्रमाच्याम माध्यामातून त्यां चे कार्यास उजाळा देण्यायत येत आहे. विविध कार्यक्रमामध्येय त्यां चे स्मृ्ती प्रित्ययर्थ संदर्भग्रंथ प्रकाशित करणे, नांदेड शहरात शंकरराव चव्हायण विष्णु पुरी प्रकल्पामजवळ त्यांरचे स्मा्रक उभारणे, नांदेड शहरात ग्रंथालय, स्पपर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र त्यावचप्रमाणे मुलामुलींचे वसतिगृह उभारणे व भोकर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणे इत्याडदी कामे पार पाडण्या,त येणार आहे. तसेच जलक्रांतीचे जनक माजी मुख्य्मंत्री स्व र्गीय शंकररावजी चव्हायण यांच्या जन्मरशताब्दीत निमित्तह जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृगष्टव काम करणाऱ्या व्याक्तीं ना ‘ जलभूषण पुरस्काहर’ प्रदान करण्याआत येणार आहे.
अगदी प्रारंभीपासूनच देशातील सर्व राज्यांनी विविध क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वाणचे योगदान असून विविध क्षेत्रात महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रभागी राहिले आहे. त्याच न्यायाने नांदेड जिल्हाच देखील विविध क्षेत्रात उतरोत्तचर प्रगती करुन राज्यारत अग्रस्थाल‍नी राहीन अशी मला खात्री पालकमंत्री अशाक चव्हाण यांनी व्यक्त करुन देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती करण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या समवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. संचलनात सहभागी प्लाटूनचे पथक पुढीप्रमाणे होते. केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, सशस्त्र पोलीस पथक (क्युआरटी) नांदेड, सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड (आरसीपी), सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, सशस्त्र महिला पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, सशस्त्र पोलीस पथक नांदेड शहर विभाग, सशस्त्र पोलीस पथक इतवार विभाग, गृहरक्षक दल पुरुष पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, गृहरक्षक दल महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक (एमएसएफ), एनसीसी मुलांचे पथक यशवंत महाविद्यालय नांदेड, महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले व मुलींचे पथक, पोलीस बँड पथक पो. मु. नांदेड, डॉग स्कॉड युनिट डॉगचे नाव बेला, बॉम्ब शोधक व नाशक पथक बीडीडीएस, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर अग्निशमक दल, देवदूत वाहन (मिनी रेस्क्यु फायर टेंडर), अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन, 108 रुग्णवाहिका, मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजनेची माहिती दर्शविणारा चित्ररथ, सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड चित्ररथ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प चित्ररथ, निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी पडताळणी कार्यक्रम, मतदार जागृती, पदवीधर नोंदणी चित्ररथाचा या संचलनात सहभाग होता.
पुरस्कार वितरण
याप्रसंगी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांस पुरस्कार वितरण करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे मा. राष्ट्रपती महोदयांकडून पोलीस पदक जाहीर झाल्याबाबत राखीव पोलीस उपनिरीक्षक पो. मुख्यालय नांदेडचे जमिल ईस्माईल सय्यद. राष्ट्रीय स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये कांस्य पदक प्राप्त केंद्रीय विद्यालय नांदेडचे चि. कर्तव्य दिगंबर करंडे. 22 वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 2019 अमरावती पुरुष गट वैयक्तिक शंभर मीटर बॅक स्ट्रोकमध्ये कास्य पदक प्राप्त नांदेडचे नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना कास्य पदक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ दिले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, प्राध्यापक व विभाग प्रमुख नेत्रशास्त्र विभाग डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण, सह. प्रध्यापक मनोविकार शास्त्र विभाग डॉ. प्रदीप बोडके, सिस्टर इनचार्ज लेबर ओटीचे श्रीमती कमल शिरिष खरात, ग्रीन कॉरीडोर यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय कामाबाबत वाहन चालक हनुमान डोईफोडे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईडस पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कुनाल किशोर तावडे, मनोज खुशालराव येरेवाड, चि. वसंत उत्तम सोमशेटवार, चि. गजानन राजू पवार, श्रृती विठ्ठलराव शिंदे, अनुष्का किशोर वाकडे, जयेश जनार्धन देशमुख, जगदिश विश्वांभर बामणे, कपील चंद्रकांत येवते, अंकिता एकनाथ दळवी, आशा नागेशराव खनसोळे, दिशा बालाजी एंगडे, शिवहर शंकर स्वामी, सार्थक सारंग नेरलकर, अनु सुर्यकांत जमदाडे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या महिला बचत गटातील जय दुर्गा महिला बचतगट नाळेश्वर, अंबीका महिला बचतगट धर्माबाद, महालक्ष्मी महिला बचतगट सरसम, समृद्धी महिला बचतगट पंचशिलनगर नांदेड, मदिना महिला बचतगट मेदनकलूर ता. देगलूर, सागर महिला बचतगट दुलेशह रहेमाननगर नांदेड यांचा अध्यक्ष व सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती पार पडल्या. यात महात्मा फुले हायस्कुल विजयनगर नांदेड, खालसा हायस्कुल नांदेड, नागसेन हायस्कुल प्रभातनगर नांदेड, गुजराती हायस्कूल नांदेड, महात्मा फुले हायस्कुल बाबानगर नांदेड शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांची भेट घेवून संवाद साधला तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगुज केली. सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पत्रकार, नागरिक आदींची उपस्थिती होती.