Home रायगड बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान...

बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर

733

गिरीश भोपी – पनवेल

रायगड , दि. २७ :- बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर २६ जानेवारी, २०२० रोजी कळंबोली,सप्तशृंगी मंदिर येथे ४थे रक्तदान शिबीर पार पडले. एम. जी. एम. रक्तपेढी, कामोठे या रक्तपेढीचे सहकार्य मिळाले. बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी रक्तदान शिबीर राबविले जाते. रक्तदान शिबीरास उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरास बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकारी अधिकारी पल्लवी निंबाळकर, तेजस माने, विशाल कावरे, स्वप्निल मुटके, गौरव शिंदे आणि सक्रीय सदस्य समीर जाधव, गीतांजली सावंत, राहुल चव्हाण, सोमनाथ मोरे, सचिन निंबाळकर, सतीश पाटील, जगदिश पाटील, बिरुदेव सांगोलकर उपस्थित होते.

निर्धार सामाजिक संस्थेचे कार्यकारी अधिकारी निलेश आहेर, शुभम वाळके, अजित पवार, कमलेश पाटील, अमोल गव्हाणे, किरण भोसले, हितेश नागपाल, पंकज साळवे, सुरेश झोरे आणि सदस्य उपस्थित होते. तसेच मानवाधिकार विशेष अधिकारी महाराष्ट्र राज्य मा. गणेश धोत्रे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट हेड, थायरोकेर कंपनी मा. पूजा चव्हाण, महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पत्रकार असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्ष मा. गिरीष भोपी आणि रणस्वराज्य ढोलताशा पथक प्रमुख मा. मयूर वाळके आणि सहकारी मा. विजय जळे या मान्यवरांनी रक्तदान करुन उपस्थिती दर्शविली. गेल्या २ वर्षांपासून बांधिलकी प्रतिष्ठानकडून रक्तदानाची मोफत सेवा गरजूंना पुरवली जाते. ही सेवा अशीच चालू राहण्याचा सर्वांनी प्रजासत्ताक दिनादिवशी मानस केला आणि शिबीर पार पडले.