Home मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

200

मुंबई, दि.23 : बाळासाहेब ठाकरे यांना जयंती  निमित्त विधान भवनात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य श्री.दिवाकर रावते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे मा.सभापती यांचे सचिव महेंद्र काज, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.