तब्बल १४ लाख २० हजारांचा गुटखा जप्त…!
मनिष गुडधे
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील ब्राम्हणवाडा थडी येथे पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे भल्या पहाटे गुटखा पकडण्याकरीता नाकेबंदी करण्यात आली होती.सकाळी ५ वाजता बैतूलहून घाटलाडकीकडे संशयितरित्या येणाऱ्या चार चाकी आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला.यामध्ये पान पराग, पान बहार, हॉट गुटख्याचे खाकी पांढरे पोते मिळाले. सदर मालाची एकुण कींमत १४ लाख २० हडार तसेच आयशर वाहन क्रमांक एम पी ०४ जि ए ६५९७ ची कींमत १० लाख रू असा एकुण २४ लाख २० हजारांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला.यामध्ये आरोपी मनिष इमरत धुर्वे, सुनिल रतन साहू यांना अटक करण्यात आली असून ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन येथे अप क्र. ३२/२०२२ कलम १८८, २७२, २७३ भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभारी ) श्री. निलेश पांडे, ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राजस, नापोका सचिन भोंबे यांनी पार पाडली.गुटखा कुणाचा?
इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली असताना आता हा गुटखा कुणाचा? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. परंतू त्याबाबत अद्याप कुठलिही माहीती प्राप्त झालेली नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.प्रतिबंधित गुठख्याच्या विक्रीस अभय कुणाचे?अमरावती जिल्ह्यात राजरोसपणे गुटख्याची सर्रास विक्री केली जाते, अज झालेल्या कारवाईमुळे ही बाब आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे गुटख्याच्या या अवैध विक्री आणि वाहतुकीस अभय कुणाचे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.दरम्यान ही कारवाई जरी मोठी असली तरीही गुटख्याच्या विक्रीची पाळेमुळे ही अमरावतीमधूनच उगम पावतात त्यामुळे आता गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाई मोहीम राबवली जाणे गरजेचे आहे.