देवानंद जाधव
यवतमाळ / आर्णी , दी. 23 जानेवारी 2022- तालुक्या अंतर्गत येणाऱ्या अंबोडा येथील शेतकऱ्यांनी रस्त्याची केलेल्या मागणी करिता दोन वेळा सदर मोका पाहणी साठी आलेल्या नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पाहणी केली या मोका पाहणीत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पाहणीनुसार वस्तुस्थिती अहवाल न देता दिशाभूल करणारा खोटा अहवाल दिले या अहवालावरून नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्यांचा अर्ज खारीज केले याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी बोगस अहवाल देणाऱ्या या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्या साठी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर तक्रारीची दखल न घेतल्यामुळे दिनांक 25 जानेवारीला शेतकरी आमरण उपोषणाला बसत असल्याबाबतचे नायब तहसीलदार उदय तुंडलवार यांना एक निवेदन दिले. शेतामध्ये जाण्याकरिता शेतकरी रस्त्यासाठी 2012 पासून रस्त्याच्या मागणीसाठी अर्ज करीत आहे परंतु प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी यांचा मुळे व भ्रष्ट राजकीय गाव पुढारी यांच्यामुळे या शेतकऱ्यांना रस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.शेतकऱ्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असून शेती वहिती करिता पोट हिस्यातून रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रीतसर पोट हीस्यातून रस्ता वहिवाट साठी अर्ज दिले सदर रस्त्या करिता मोका पाहणी साठी नायब तहसीलदार गजभिये मंडळाधिकारी मनवर व तलाठी ममता पवार यांनी सदर शेतकरी समक्ष दोन वेळा मोका पाहणी केली घटनास्थळी कोणतेही मौल्यवान सागवान चे झाड रस्त्यात येत नाही कोणतीही अडचण नाही असे नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना सांगितले परंतु तलाठी ममता पवार आणि मंडळ अधिकारी मनवर यांनी गैरअर्जदार यांच्याशी हात मिळवणी करून पदाचे दुरुपयोग करून पश्चिम व पूर्व च्या शे. सर्वे नंबर 36 45 44 धुर्यावर सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मौल्यवान सागवान ची झाडे धुऱ्यावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे परंतु धूर्यावर मौल्यवान सागवान ची झाडे थोडे फार असून रस्त्याला अडथळा येत नाही. सदर रस्त्यासाठी अर्जदारांना कवठा बाजार ते शिव धुर्यावरून 41 व 42 चा धुर्याने बाबू सिंग व अबूसिंग यांच्या स्वमालकीच्या शेतातून सर्वे नंबर 43 यांच्या नाल्याच्या काठाने रस्ता देण्यात यावा .पोट हिस्यातील जवळचा रस्ता न देता दूरचा रस्ता देणे,बाबुसिंग यांच्या स्वमलकीतुंच रस्ता का ?शेताला धुरा नाही, तलाठी यांनी दिलेल्या अहवालात मौल्यवान सागवान धुर्यावर असताना गैर अर्जदाराला नाला पर्यंत रस्ता देता येतो का ?गैर अर्जदाराला रस्ता देता येतो मग अर्जदाराला का नाही? मोका पाहणी करून वस्तुस्थिती अहवाल न देता खोटा दिशाभूल करणारा खोटा अहवाल देणे, नायब तहसीलदार यांना मोका पाहणीनुसार वस्तुस्थिती माहिती असताना देखील तलाठी ममता पवार यांनी दिलेला खोटा अहवालावरून शेतकऱ्यांच्या रस्त्याच अर्ज खारीज करणे हा कर्तव्यावर कसूर असून अश्या भ्रष्ट महसूल प्रशासनाचा निषेध करून नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी मनवर, व ममता पवार यांना निलंबित करून फौजदारी कारवाई करण्यात यावी व मागणी नुसार पोट हिस्यातुन शेतामध्ये जाण्या साठी रस्ता देण्यात यावे यासाठी 25 जानेवारी रोजी आर्णी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असून याच्या प्रती कॅबिनेट महसूल मंत्री, खासदार बाळासाहेब धानोरकर, आमदार मिलिंद दुर्वे, महसूल आयुक्त कार्यालय अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ , महसूल उप विभागीय अधिकारी यवतमाळ,ठाणेदार आर्णी, यांना देण्यात आले असून निवेदन देते वेळेस बाबू सिंग राठोड ,बलदेव पाटील, प्रवीण पाटील, गौतम पाटील, चंदन राठोड आदी शेतकरी उपस्थित होते.