Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी गणपती नेत्र ऑप्टिकल्स्च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर

कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी गणपती नेत्र ऑप्टिकल्स्च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर

608

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील गणपती नेत्र आॅप्टिकल्स् च्या वतीने बुधवारी,२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजातील उपेक्षित गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी, निराधार, अपंग याकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरिय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी दीपा बहेन, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी ग्रामिण रूग्णालय घनसावंगी येथील नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.व्हि.व्हि.देशमुख, बालरोग तज्ञ डॉ.जी.डी.आस्कंद, डॉ.रशीद पटेल, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर,गोपालभैया राजुरकर, कल्याणराव तौर, किशोर मुन्नेमाणिक, अर्जुनराव कुरधने, मदनराव नाईक,दत्ताराव जगताप,दत्ता म. टरले, राधाकृष्ण भालेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन गणपती नेत्र आॅप्टिकल्स्चे संचालक आदित्य बिलोरे, लक्ष्मण बिलोरे यांनी केले आहे.