बुलडाणा/प्रतिनिधी – थोर संत महापुरुषांनी त्या त्या काळात केलेल्या सामाजिक कार्यामुळे ते अजरामर झाले व त्यांचे स्मारक बुलडाणा सारख्या शहरात होत आहेत ते उद्याच्या पिढीला प्रेरणादायक ठरतील असे उदगार जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संगम चौक येथे गुरु रविदास स्मारकाच्या सौंदर्यीकरणाच्या जागेचे भूमीपूजन कार्यक्रमात केले,आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलडाण्यात विविध महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येत असुन संगम चौकात प्रस्तावित स्मारकासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी आमदार गायकवाड यांनी उपलब्ध करून दिला.
आहे तर आ. गायकवाड या वेळेस बोलतांना म्हणाले की गरु रविदास यांनी सामाजिक सेवाकार्य करत असतांना समता बंधुत्व भाव जपला व अशा थोर महापुरुषांना आपण जातीपातीच्या आधारावर वाटून घेणे म्हणजे त्यांची थोरवी कमी करण्यासारखे आहे तर सर्व थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी सर्व समाजांनी एकत्र येऊन साजरी करण्याचा आदर्श आपण उगवत्या पिढीपुढे ठेवला पाहिजे त्या साठीच बुलडाणा शहरात विविध महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येत आहेत,असे मतही व्यक्त केले.या कार्यक्रमास खासदार प्रतापराव जाधव,बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदरभाऊ बुधवत, सहसंपर्क प्रमुख प्रा.नरेश खेडेकर, दत्ता पाटील,संत रविदास स्मारक समितीचे अध्यक्ष कुणालभाऊ गायकवाड,कार्याध्यक्ष इंजिनियर डि.टी.शिपणे जि प सदस्या शिलाताई शिपणे,पंचायत समिती लोणारचे उपसभापती मदनराव सुटटे,माजी सरपंच अशोकराव पसरटे,उर्मिला ठाकरे,शोभाताई चांदोरे,प्रकाश डोंगरे,के.एम.वैरी,अशोक भोसले,युवाप्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे,अशोकराव शिंगणे,भाष्कर चांदोरे,ॲड राजेश खुर्दे,यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,या कार्यक्रमास,धनराज पुरभे,सुभाष पुरभे,तेजराव पुरभे,भिमराव रिठे,शंकर सोनुने,उपजिल्हाप्रमुख,न प उपाध्यक्ष विजुभाऊ जायभाये नपचे सर्व नगरसेवक, महिला आघाडीच्या आशाताई झोरे, चंदाताई बडे, लखन गाडेकर शिवसेना तालुका प्रमुख, बुलडाणा शहरप्रमुख गजानन दांदडे,यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,समाज बांधव , महिला भगिनी इ मोठया संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन प्रविण निमकर्डे यांनी तर आभार मनोज पऱ्हाड यांनी मानले