Home नांदेड नाभिक समाजाचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

नाभिक समाजाचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

121

धर्माबाद – ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

धर्माबाद तालुक्यातील मौजे सिरजखोड येथील नाभिक समाजाच्या सांस्कृतिक तथा धार्मिक कार्यासाठी समाज मंदिरासाठी जागा देण्यात यावी अशी मागणी काही वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधीत समाजाने (दि.२५) रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणास सुरुवात केली होती, त्यानंतर मा. तहसीलदार, विस्तार अधिकारी(पं.स.धर्माबाद), सरपंच यांच्या लेखी अश्वासनांनातर सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे.
धर्माबाद तालुक्यातील मौ. सिरजखोड येथे नाभिक समाजाला धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी समाज मंदिरासाठी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय जिवासेनाच्या वतीने समस्त समाज बांधवांतर्फे करण्यात आली होती, संबंधित विषय ग्रामसभेच्या मासिक सभेत चर्चेत ठेवून सरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक आदींच्या सहमतीने संबंधीत समाजाला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यासोबतच सदरील जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी व मोजमाप करण्यात आले होते, त्याप्रमाणे निश्चित केलेली जागा नाभिक समाजाला अद्याप देण्यात आली नसल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली असून वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा सदरील जागेचा ताबा समाजाला अधिकृतरित्या देण्यात आला नव्हता त्यामुळे संबंधित समाजाने उपोषणस सुरुवात केली होती. त्यावर चर्चा करून उपरोक्त अधिकाऱ्यांनी सदर विषय नव्याने ग्रामसभेत ठेवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.