Home बुलडाणा प्रहार जनशक्ती पक्षात असंख्य युवकांचा प्रवेश

प्रहार जनशक्ती पक्षात असंख्य युवकांचा प्रवेश

586

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शिंगणे यांच्या उपस्थित सिंदखेडराजा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षात असंख्य युवकांचा प्रवेश घेण्यात आले व सिंदखेडराजा मतदार संघातील अपंगाच्या समस्या जाणून घेऊन मार्गी लावणार

प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-प्रहार चे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सिंदखेडराजा मतदान संघातील येथील शेकडो कार्यकत्यांच्या हाताला सेवाबंधन बांधून प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला. याव वेळी संतोष शिंगणे म्हणाले की प्रहार हा एक पक्ष नसून परिवार आहे याचं प्रहार परिवारात आपले सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत आहे तर प्रहरच्या माध्यमातून समाजाची, गरिबांची, शेतकऱ्यांची, अपंगांची, निराधार ची सेवा सेवा कशी घडेल यावर मार्गदर्शन करण्यात आले समाजाची सेवा आपल्या प्रहार तर्फे घडावी म्हणून सेवाबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले .
बुलढाणा जिल्ह्यात गाव तिथे शाखा घर तिथे प्रहार सेवक असा उपक्रम राबविला जाईल असे संतोष शिंगणे यांनी आपल्या प्रहार कार्यकर्त्यांना संबोधले

मा.संतोष शिंगणे कामगार जोडो महासंवाद अभियान मा.ना. बच्चू कडू यांच्या संकलपनेतून

मा.ना.बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री हे येत्या काही दिवसांनी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे राज्य मंत्री श्री बच्चु भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून बुलढाणा सहित अनेक जिल्ह्यांमध्ये संतोष शिंगणे कामगार जोडो महासंवाद अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात जलसंपदा,शिक्षण,महिला व बालविकास,ईतर बहुजन मागास कल्याण विभाग , कामगार विभाग या विभागांचा व विविध योजना सामान्य नागरिक यांचे प्रश्न समजुन घेण्यात येणार आहेत या अभियानात अनाथ अपंग मेळावा, महिला व बालविकास विभाग यांचा शिशु गृह, बालगृह, ईतर संस्थांना भेटी देऊन अडी अडचणी समजून घेणे, धरण व पुनर्वसन ग्रस्त गाव भेटी, भटक्या विमुक्त जाती जमाती गावांना भेटी,वीटभट्टी कामगार भेटी व नोंदणी, घरेलु महिला कामगार मेळावा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहेत यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष विष्णू देशमुख, अरुण परिहार, विनोद नागरे, नंदकिशोर देशमुख, गजूभैया घुगे,समाधान देवखाने, उद्धव पारखे, विजय तायडे, लनकावती पारखे, मुकेश जाधव, प्रमोद वरुडे, रवींद्र लाखे, बाबुराव पारखे, गौतम उबाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.