Home बुलडाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

190

 

रिपब्लिकन सेनेची मागणी

प्रा , तनजीम हुसेन ,

चिखली

-आज दि २८ जानेवारी २०२२ रोजी चिखली ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनामध्ये नमुद करण्यात आले की, मुंबई मधील मालवाणी परीसरातील एका मैदानाला टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले,टिपु सुलतान यांनी ईंग्रजांविरुद्ध लडतांना आपल्या प्राणाची आहुती देवुन भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाची भुमीका निभावली आहें.
परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एका ‘धर्माच्या विरोधात लडणारे’संबोधुन स्वातंत्र्य सेनानी टिपु सुलतान यांचा अपमान केला आहे.म्हणुन त्यांचा निषेध करत जयस्तंभचौक चिखली येथे देवेंद्र फडवणीस यांच्या फोटोला चपला मारून पायाखाली तुडवून घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा कार्याध्यक्ष सलीम भाई, जिल्हा कामगार नेते सुरेश भाऊ इंगळे, शहराध्यक्ष सुनील सोळंके, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे,युवा शहराध्यक्ष शेख मलिक, तालुका उपाध्यक्ष अन्सार भाई पप्पू खान युवा शहर उपाध्यक्षअप्पु खान, पप्पू बागवान, अज्जु पठाण, शेख दानेश, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.