Home नांदेड जीवनात भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन करावे – तहसीलदार स्नेहलता स्वामी

जीवनात भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन करावे – तहसीलदार स्नेहलता स्वामी

202

धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती ता. धर्माबाद येथील विद्यार्थ्यांचा त्र्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनी गुगल मीटवर ऑनलाईन भाषणाचा कार्यक्रम शिक्षण विस्तार अधिकारी तथा उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक श्री शिवकुमार पाटील यांनी आयोजित केला होता.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव च्या तहसीलदार लेखिका-कवयित्री श्रीमती स्नेहलता स्वामी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ठाणे येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका श्रीमती ज्योती बेलावले, जिल्हा बुलढाणा येथील शिक्षिका श्रीमती संध्या जैन ,नांदेडच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती अनिता दणे-झुंबड ,दैनिक पुढारीचे पत्रकार श्री सतीश पाटील शिंदे ,ख्यातनाम वक्ते तथा पत्रकार शिवराज पाटील गडीवान, राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य श्री सौरभ सक्सेना, प्रा शाळा पाटोदा बु चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक अशोक  कागेरू  शा व्य समिती अध्यक्ष श्री बालाजी भोसले हे उपस्थित होते.या कार्यक्रमात श्री साईनाथ भोसके ,हनुमंत काळेवार, सहशिक्षक श्रीगोविंद येळगे श्री पंडित दगडगावे, शाळेच्या पालक व असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.या कार्यक्रमात मराठी, हिंदी ,इंग्रजी भाषेत एकूण 14 विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली पत्रकार श्री सतीश पाटील शिंदे ,पत्रकार श्री शिवराज पाटील गडीवान श्रीमती संध्या जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठाणे येथील शिक्षिका श्रीमती ज्योती बेलावले म्हणाले की, “संविधानाने आपणास सुरक्षा प्रदान केली आहे; विद्यार्थ्यांनो तुम्ही प्रयत्न करून स्वतःच्या प्रगतीचे पुस्तक तयार करा.” अध्यक्षीय समारोपात तहसीलदार कवयित्री लेखिका श्रीमती स्नेहलता स्वामी यांनी “राष्ट्रीय उत्सव साजरा करणे महत्त्वाचे आहे ;जीवनात संविधानातील मूल्यांचेअनन्यसाधारण महत्त्व आहे. व राष्ट्राच्या उन्नतीसाठी कदम से कदम मिला कर चलना होगा असे आवाहन केले.” कार्यक्रमाचे संयोजक शिक्षण विस्तार अधकारी शिवकुमार पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.