Home नांदेड देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी टिपु सुलतान ब्रिगेड ची मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी टिपु सुलतान ब्रिगेड ची मागणी

450

धर्माबाद: ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला. यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तर्फे उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.


राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपुसुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे. जाणून-बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा हिंदूंवर अत्याचार करणारा अशा शब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा माननीय राष्ट्रपती महोदयांच्या सुद्धा अवमान आहे. याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तर्फे करण्यात आली आहे.
निवेदनावर टिपू सुलतान ब्रिगेड मराठवाडा सचिव नवीन तालुकाध्यक्ष मिर्झा खुर्रम बेग उपाध्यक्ष मिर्झा इब्राहिम बेग तालुका सचिव सय्यद शाहिद अली. मिर्झा जुनेद बेग सय्यद बाबर सय्यद मुजीब मो रेहान कुरेशी सय्यद इम्रान अली यांच्या स्वाक्षरा आहेत.
तसेच या निवेदनाला मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच यांचा पाठिंबा आहे असे तालुकाध्यक्ष सय्यद बाबर उपाध्यक्ष शेख गौस व सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.