प्रतिनिधी -: धनराज खर्चान
अमरावती / भातकुली -: युवा लायन्स सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी व निंभा वासेवाडी या गावाच्या पुनर्वसन मागणीसाठी दी.२४ जानेवारी पासून निभा गोपगव्हान या मुख्य रस्त्यावर निम्मं पेढी प्रकल्पाच्या भिंतीलगत पेढी प्रकल्पाचे काम बंद आंदोलन करण्यात आले होते, परंतु २४ जानेवारीला मागण्या पूर्ण न झाल्यामुळे व संबंधित अधिकारी हे उडवाउडवीची उत्तर देत असल्यामुळे शेतकरी गावकऱ्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे त्यांनी धरणे आदोलणाचे स्वरूप बदलून २५ जानेवारी पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुर करण्यात आले आदोनल सुर असताना २८ जानेवारीला सकाळी निम्मं पेढी प्रकल्पाच्या लेबर कंत्राटदाराला काम बंद करण्याकरिता चाकूच्या धाकावर धमकावण्यात आले व त्यांना अश्लील शिवीगाळ तसेच मारहाण देखील करण्यात आली याप्रकरणी लेबर कंत्राटदार वसंत गोस्वामी वय ४१ बनोसा दर्यापूर यांच्या तक्रार वरून युवा लायन्स ग्रुपचे अध्यक्ष योगेश गुडधे वय ४० डेब्या हिवराळे वय ३५ राहणार दोघेही नींभा विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा उपस्थित होता अधिक तपास बडनेरा पोलिस करत आहे.