शौकत भाई शेख ,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा अहमदनगर मराठी भाषा विभाग आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कवी संमेलनात सादरीकरणा साठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कवी,गझलकार रज्जाक शेख यांच्या कवितेची निवड झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी तसेच पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सोमवार दिनांक ३१/०१/२०२२ रोजी दु. १२:३० वाजता आणि मंगळवार दिनांक १/०२/२०२२ रोजी दु. १२:३० वाजता कवी संमेलनाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांमधील साहित्यिकांना कवी संमेलनाचे हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सहभागी कवींना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सदर संमेलनाला जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे आयोजन गणेश सांगळे, संदीप वाकचौरे समन्वयक तथा विषय सहाय्यक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर श्रीम.रंजना लोहकरे विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, श्री.भगवान खारके,प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहमदनगर हे मान्यवर करत आहेत.रज्जाक शेख (श्रीरामपूर) यांनी मागील वर्षीच्या संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली होती.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या एक हजारा पेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांकात प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता, लेख, हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,अष्टक्षरी,गजल आदी काव्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता, कथा , लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर त्यांच्या व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब,एसीबीएन न्युज,सी ९ न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स, भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रमांचे त्यांनी सादरीकरण केले आहे. वर्ड सामना, शब्दरसिक,क्रांतिसूर्य,लक्ष्मीपुत्र, गोंदण,ग्रामसेवा,आसमंत काव्यप्रेमीचे,भगवानबाबा आदी दिवाळी अंकात तसेच त्यांच्या दर्जेदार कविता प्रतिलिपी, स्टोरीमिरर,लागीर झालं या ऍपवर सापडतात.ते जीवन गौरव शैक्षणिक मासिक सहसंपादक , शब्दविद्या दिवाळी अंक उपसंपादक,काव्यदरबार बालकाव्य विशेषांक संपादक या पदावर ते साहीत्य चळवळीचे काम पाहतात .त्यांनी आतापर्यंत शंभरच्यावर कविसमेलनाच्या मंचावर कवितांचे सादरीकरण केले आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात, अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे, अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत पंच्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.