-प्रतिनिधी ३० जानेवारी फोटो
अंढेरा, ता. चिखली : – ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी , तलाठी , कृषी सहाययक हे विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत. या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोजच कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरी उपस्थिती प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी आहे. गावाचा विकास खऱ्या अर्थाने साधायचा असेल तर,या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सुरू गरज निर्माण झाली आहे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे .
महाराष्ट्र शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनात सुबत्ता आणण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक हजेरी उपस्थिती प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. ज्या शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा उपयोग केला आहे, अशा कार्यालयात कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश आले आहे. मात्र ज्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी नाही अशा कार्यालयात कर्मचाऱ्यांवर कुणाचा अंकुश नसल्याने विकासाचा कणा हा मोडून पडलेला आहे चिखली तालुक्यातील ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहाय्यक हे कार्यालयीन वेळेत कधीच उपस्थित राहात नाहीत तर, कित्येक गावामध्ये हे कर्मचारी ८ ते १५ दिवसांत एखाद्या वेळेस काही कालावधीसाठी हजर राहतात , असा अनागोंदीचा कारभार चिखली तालुक्यात सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी उपस्थिती प्रणाली ही आजच्या टेक्निकल युगात सहज शक्य आहे. अतिशय दुर्गम भागात नेटवर्क पोहचलेले आहे. त्यामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन कामे अधिक गतीने करणे सोईचे झाले आहे . ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहाय्यक यांची कागदोपत्री अथवा ऑनलाईन माहिती सादर करणे म्हणजेच कर्मचारी हजर राहात आहेत, असे समजले जाते परंतू तालुक्यातील बहुतांश नागरिकांच्या तक्रारी आहेत की, ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहाय्यक हे गावपातळीवर हजरच होत नसल्याने ग्रामस्थांना दाखले मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहाय्यक यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीशी जोडण्यात यावे अशी मागणी होत आहे .